गोधन अंगावरून धावण्याची परंपरा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 22:09 IST2018-11-09T22:08:56+5:302018-11-09T22:09:15+5:30

मोहाडी तालुक्यातील जांभोरा येथे अंगावरून गोधन धावविण्याची परतेकी कुटुंबाने सुरू केलेली १५० वर्षाची परंपरा यावर्षीही जोपासली आहे. बलीप्रतिपदेच्या दिवशी २५० गायी गुराखी विनायक सुरेश परतेकी (२८) यांच्या अंगावरून धावल्यानंतरही त्याला इजा झाली नाही.

There is a tradition of running from Gorhan | गोधन अंगावरून धावण्याची परंपरा कायम

गोधन अंगावरून धावण्याची परंपरा कायम

ठळक मुद्देजांभोरा येथील परतेकी कुटुंबाचा उपक्रम : मिरवणूक काढून गोमातेचे पूजन

लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील जांभोरा येथे अंगावरून गोधन धावविण्याची परतेकी कुटुंबाने सुरू केलेली १५० वर्षाची परंपरा यावर्षीही जोपासली आहे. बलीप्रतिपदेच्या दिवशी २५० गायी गुराखी विनायक सुरेश परतेकी (२८) यांच्या अंगावरून धावल्यानंतरही त्याला इजा झाली नाही. गावातून मिरवणूक काढून विधिवत गोमातेचे पूजन करण्यात आले.
बलीप्रतिपदेच्या दिवशी विदर्भात विविध पद्धतीने गोधनाची पूजा करण्याची प्रथा आहे. परंतू जमिनीवर पालथे पडून अंगावरून गोधन धावविण्याची वैशिष्टेपूर्ण परंपरा मोहाडी तालुक्यातील जांभोरा गावातील परतेकी कुटुंबाने आजही जोपासली आहे. १५० वर्षापूर्वी गुराखी नारायण परतेकी यांनी ही परंपरा सुरू केली. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा सुरेश परतेकी यांनी वडिलांची परंपरा सुरू ठेवली. सुरेश परतेकी यांचे वय झाल्यामुळे आता त्यांचा मुलगा विनायक परतेकी ही परंपरा सुरू चालवित आहे.
गुराख्याकडून गावातील सर्व गार्इंना आंघोळ करविली जाते. गार्इंना सजवून, नवीन दावे, गेटे, म्होरकी बांधून गेरू व रंगाने संपूर्ण अंग, शिंगे रंगविले जातात. गार्इंना मोहफुल, पिठ, तांदळाची खिर खाऊ घातल्यानंतर संपूर्ण गावातून वाजतगाजत मिरवणूक काढली जाते.
मिरवणूक चौकात आल्यानंतर गुराखी जमिनीवर पालथा झोपतो आणि गोधन त्याच्या अंगावरून जातो. तरी देखील गुराख्याला इजा होत नाही. कार्यक्रम पाहण्यासाठी परिसरातून नागरिक जांभोरा गावात येतात. ग्रामस्थ राजकीय मतभेद, आपसी वैर बाजुला ठेवत गोधन पूजेला उपस्थित राहतात. यावर्षीही परंपरा जोपासली गेली, मात्र गुराख्याला कुठलीही दुखापत झाली नाही.

Web Title: There is a tradition of running from Gorhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.