रोजगारासाठी ‘त्यांचा’ मृत्यूच्या दाढेतून प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2016 00:51 IST2016-02-28T00:51:58+5:302016-02-28T00:51:58+5:30

उमरेड-कऱ्हांडला व्याघ्र प्रकल्पांतर्गत पाऊणगाव हे गाव पवनी तालुक्याच्या शेवटच्या टोकावर वसलेले आहे. एकीकडे मरू नदी व गोसे प्रकल्पाच्या ओव्हरफ्लो पाण्याने तुडूंब भरलेली आहे.

'Their' journey to death from their stomach for employment | रोजगारासाठी ‘त्यांचा’ मृत्यूच्या दाढेतून प्रवास

रोजगारासाठी ‘त्यांचा’ मृत्यूच्या दाढेतून प्रवास

व्यथा पाऊणगाववासीयांची : पुनर्वसनाची प्रतीक्षा, जगणे झाले कठीण
निश्चित मेश्राम पालोरा
उमरेड-कऱ्हांडला व्याघ्र प्रकल्पांतर्गत पाऊणगाव हे गाव पवनी तालुक्याच्या शेवटच्या टोकावर वसलेले आहे. एकीकडे मरू नदी व गोसे प्रकल्पाच्या ओव्हरफ्लो पाण्याने तुडूंब भरलेली आहे. तर दुसरीकडे गावाला जाण्याकरीता सहा कि़मी. घनदाट जंगलातून जावे लागते. रोजगाराचा शोधात येथील नागरिक जीव मुठीत घेवून प्रवास करीत आहे. या प्रश्नाकडे लक्ष देऊन पाऊणगाव वासीयांचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली.
पवनी तालुक्यात व्याघ्र प्रकल्पांतर्गत अनेक गावाचे पुनर्वसन करण्यात आले आहे. मात्र ज्या प्रसंगी गावाचे पुनर्वसन करायचे होते त्या प्रसंगी या गावाला भिवापूर- नागपूर राज्यमार्गावर दाखविण्यात आले. व्याघ्र प्रकल्पाच्या चुकीच्या नियोजनामुळे हे गाव वगळण्यात आले. परिणामी या गावातील जनतेला जीव मुठीत घेवून रहावे लागत आहे. गावाचे पुनर्वसन करण्यात यावे म्हणून येथील जनतेनी अनेकदा संबंधित विभागाल निवेदन दिले. मात्र याकडे कुणीही दिले नाही.
गावात कोणतेच रोजगार नसल्यामुळे जीवन कसे जगावे, शासनाच्या कोणत्याही योजना या गावापर्यंत पोहचत नाही. पाऊनगावची जवळपास १,२०० लोकसंख्येचे गाव आहे. मेंढपाळ हे त्यांचे मुख्य व्यवसाय आहे. हा गाव उमरेड-कऱ्हांडला या व्याघ्र प्रकल्पात येत असल्यामुळे येथे जनावरांना चराईला बंदी आहे. घनदाट जंगलात हे गाव वसले आहे. जनावरे चराईला बंदी असल्यामुळे गावात कोणतेच रोजगार उरले नाही. या भागात बऱ्याच प्रमाणात नदीकाठावर शेती आहे. मात्र वन्यप्राण्यामुळे पिकाची नासाडी केल्या जाते. पिक रक्षणाकरीता शेतात मचान बांधून पिकाचे रक्षण करावे लागते. वन्यप्राणी नासाडी करतात. मात्र संबंधित विभागाकडून कोणतीही मदत दिली जात नाही. गावात दररोज वन्यप्राणी येत असतात.
वन्य प्राण्यामुळे गावात मुकायला कुत्रेसुद्धा राहिले नाही. वाघोबाचे तर दररोज दर्शन होतात. गावात रोजगार नसल्यामुळे येथील महिला तुटक्या फुटक्या डोंग्यावर बसून नदीतून प्रवास करतात. अनेकदा डोंगे पलटी मारतात वितभर पोटासाठी अनेकांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागतो.
पवनी येथे जायचे असल्यास घनदाट जंगलातून प्रवास करावा लागतो.येथे आरोग्य, शिक्षण अशा कोणत्याच सुविधा नाहीत. सदर प्रतिनिधीने गावाला भेट दिली असता येथील अनेक महिलांनी आपल्या व्यथा मांडल्या.
वनमंत्री आज ना उद्या आमच्या गावाची पाहणी करण्याकरीता येतील हिच अपेक्षा करून आहे. मात्र आजपर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधींनी व वनमंत्र्यांनी भेट दिली नाही. सायंकाळी ५ वाजेपासूनच हा रस्ता वन्यप्राण्याच्या भितीने बंद होते.
गावाच्या ५ कि़मी. वन विभागाची चौकी आहे. समोर पाऊनगाव असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना थांबविले जात नाही, अशा प्रसंगी वन्य प्राण्याची शिकार करणारी टोळी जावू शकते. याकडे वनविभागासह जिल्हा प्रशासनाने लक्ष दिल्यास पाहुणगाववासीयांची समस्या मार्गी लागू शकते.

कुजलेल्या डोंग्यातून जीवघेणा प्रवास
पाऊणगावात कोणतेही रोजगार उरले नसल्यामुळे येथील महिला वर्ग वितभर पोटाची खळगी भरण्यासाठी नदीतून कुजलेल्या डोंग्यातून प्रवास करतात. एकीकडे घनदाट जंगल व दुसरीकडे पाण्याने तुडूंब भरलेली मरू नदी आहे. जवळच भिवापूर आहे. येथे मिरचीचे सातरे सुरू आहेत. येथे जाण्याकरिता नदी पार करावी लागते. अनेकदा हा डोंगा नदीत पलटी झाला आहे. मात्र आजपर्यंत कोणतीही जीव जाण्याची घटना घडलेली नाही.
गावात भुंकायला कुत्रे नाहीत
गावाच्या सभोवताल जंगल असल्यामुळे जंगलातील प्राणी गावात येथून पाळीव प्राण्याची शिकार करीत आहे. गावात कुणी प्राणी आला असता कुत्रे भुुंकत होते. परिणामी ग्रामस्थ सावधान राहत होत होते. गावात पाळीव प्राणी नाही. आता वन्य प्राणी कुत्र्याची शिकार करीत असल्यामुळे गावात कुत्रे सुद्धा दिसतनाहीत, अशी दैनावस्था पाऊनगावाची आहे.

Web Title: 'Their' journey to death from their stomach for employment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.