वडिलांना व्हिडिओ कॉल करून तरुणाने घेतली धरणात उडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2022 19:42 IST2022-03-29T19:41:43+5:302022-03-29T19:42:21+5:30
Bhandara News गाेंदिया जिल्ह्यातील तरुणाने वडिलांना व्हिडिओ काॅल करीत कवलेवाडा धरणात उडी मारली. ही घटना साेमवारी उघडकीस आली.

वडिलांना व्हिडिओ कॉल करून तरुणाने घेतली धरणात उडी
भंडारा : गाेंदिया जिल्ह्यातील तरुणाने वडिलांना व्हिडिओ काॅल करीत कवलेवाडा धरणात उडी मारली. ही घटना साेमवारी उघडकीस आली. स्पर्धा परीक्षेतील नैराश्यामुळे त्याने आत्महत्या केल्याची माहिती पुढे आली आहे. याप्रकरणी सिहोरा ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.
ऋषीलेश राजू कनोजे (२८) वर्ष रा. श्रीनगर चंद्रशेखर वार्ड, गोंदिया असे मृताचे नाव आहे. ऋषीलेशचे बी.कॉम. झाले असून, तो २०१३ पासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत होता. त्याने अनेक स्पर्धा परीक्षा दिल्या होत्या. परंतु, यश मिळत नव्हते. यामुळे तो नैराश्यात गेला. या नैराश्यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न घरच्यांनी केले. परंतु नैराश्य कमी झाले नाही. रविवारी दुपारी ३ वाजता तो गोंदिया घरून निघाला. सिहोरा परिसरातील वांगी गावांचे शेजारी असणाऱ्या कवलेवाडा धरणावर दुचाकीने आला. आपल्या वडिलांना व्हिडिओ कॉल करून आत्महत्या करीत असल्याची माहिती दिली. या प्रकाराची माहिती क्षितिज कनोजे यांनी सिहोरा पोलिसांना दिली. पोलिसांनी शोधमाेहीम राबविली. सोमवारी त्याचा मृतदेहच हाती आला. तपास सहायक पोलिस निरीक्षक नारायण तुरकुंडे करीत आहेत.