शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' दोन्ही दाम्पत्याचा गोंदियाचा प्रवास ठरला शेवटचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 11:34 IST

चांदोरी आणि पिपरी येथे गावावर पसरली शोककळा : राजेगाव-मोरगाव व कुंभली येथील प्रवाशाचा मृतांमध्ये समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा/साकोली/शहापूर: गोंदिया जिल्ह्यातील सहक अर्जुनी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या डव्वा येथे शिवशाही बस उलटल्याने झालेल्या भीषण अपघातात ११ प्रवासी जागीच ठार झालेत, यात भंडारा तालुक्यातील पिपरी येथील तथा साकोली तालुक्यातील चांदोरी येथील प्रत्येकी एका दाम्पत्याचा समावेश आहे. या दोन्ही दाम्पत्याचा शिवशाही बसमधील प्रवास शेवटचा ठरला. राजेश देवराम लांजेवार व मंगला राजेश लांजेवार रा. पिपरी आणि रामचंद्र कनोजे व अंजिरा रामचंद्र कनौजे रा. चांदोरी अशी या मृत दाम्पत्यांची नावे आहेत. या दाम्पत्यांच्या मृत्यूची वार्ता कळताच गावात शोककळा पसरली. 

माहितीनुसार, साकोली तालुक्याच्या चांदोरी येथील मूळ रहिवासी असलेले रामचंद्र कनोजे व अंजिरा रामचंद्र कनोजे यांची विवाहित मुलगी गोंदिया येथे राहते. मुलीला भेटण्यासाठी कनोजे दाम्पत्य यांनी साकोली येथून शिवशाही पकडली होती. याच दरम्यान कनोजे दाम्पत्यावर काळाने झडप घातली. या अपघातात या वृद्ध दाम्पत्याचा जागीच करूण अंत झाला, वृत्त लिहीपर्यंत कनोजे दाम्पत्यांचे मृतदेह त्यांच्या स्वगावी चांदोरी या ठिकाणी पोहोचले नव्हते. 

दूसरे दाम्पत्य भंडारा तालुक्यातील पिपरी येथील आहेत. राजेश देवराम लांजेवार (३८) व मंगला राजेश लांजेवार (३०) हे दाम्पत्य अपघातात ठार झाले. यावेळी त्यांचा दोन वर्षीय मुलगा रियांशु त्यांच्यासोबत होता. त्याच्यावर गोंदिया येथील रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. गावात राजेश व त्याचे कुटुंबीय संयुक्तपणे राहतात. कुटुंबात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, मोठा भाऊ, वहिनी असा परिवार आहे. परिसरातील गावांमध्ये जाऊन पान साहित्य विकून तो आपला उदरनिर्वाह चालवीत होता. गोंदिया जिल्ह्यातील दांडेगाव येथील नातेवाईक गोंदिया येथील रुग्णालयात भरती आहे. त्याला बघण्यासाठी राजेश व मंगला लांजेवार हे सकाळीच भंडारा येथून शिवशाहीने गोंदियासाठी निघाले होते. राजेश लांजेवार यांना आठ वर्षाची मुलगी आहे. ती घरी आपल्या आजी- आजोबांसोबत होती. दरम्यान ११ मृतांपैकी दोघांची ओळख पटली नव्हती. रात्री उशिरा त्यांची ओळख पटली, लाखनी तालुक्यातील राजेगाव (मोरगाव) येथील उदाराम तुकडू खेडकर व कुंभली येथील प्रकाश हेमणे यांचा मृतांमध्ये समावेश आहे. 

मुले झाली पोरगी राजेश व मंगला लांजेवार या दाम्पत्याला मुलगा व मुलगी आहे. रियांशू दोन वर्षांचा तर मुलगी आठ वर्षाची आहे. आई-वडिलांच्या अपघाती मृत्यूने दोन्ही मुले अनाथ झाली आहे. घरी आजी-आजोबा, मोठे बाबा, आई असली तरी आई-वडिलांच्या प्रेमापासून दोन्ही मुले पोरकी झाली आहेत.

दाम्पत्याचा शेवटही सोबतच कनौजे दापत्य मुलीच्या भेटीसाठी गौदिवाला सोबतच निघाले. सोबतच संपूर्ण आयुष्य घालवलेल्या कनोजे दांपत्याचा शेवटही सोबतच झाला. रामचंद कनोजे यांना एक मुलगा व पाच मुली, नातवंड असा आप्तपरिवार आहे.

टॅग्स :Accidentअपघातgondiya-acगोंदियाarjuni-morgaon-acअर्जुनी मोरगावbhandara-acभंडारा