ठाणा ग्रामपंचायतीमधील प्रकरण गेले पोलिसात
By Admin | Updated: September 16, 2014 23:32 IST2014-09-16T23:32:40+5:302014-09-16T23:32:40+5:30
ग्रामपंचायत ठाणा (पेट्रोलपंप) येथे एका महिला ग्रामपंचायत सदस्याला भ्रमणध्वनीद्वारे शिवीगाळ करीत मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी फिर्यादी प्रीती बागडे यांनी जवाहरनगर

ठाणा ग्रामपंचायतीमधील प्रकरण गेले पोलिसात
जवाहरनगर : ग्रामपंचायत ठाणा (पेट्रोलपंप) येथे एका महिला ग्रामपंचायत सदस्याला भ्रमणध्वनीद्वारे शिवीगाळ करीत मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी फिर्यादी प्रीती बागडे यांनी जवाहरनगर पोलिसात तक्रार दाखल करून ग्रामपंचायत सदस्य सीताराम बावनगडे यांच्याविरुद्ध कारवाइची मागणी केली आहे.
भंडारा तालुक्यातील ठाणा (पेट्रोलपंप) येथे १३ ग्रामपंचायत सदस्य आहेत. यापैकी आठ महिला सदस्य व पाच पुरुष सदस्य आहेत. येथे भाजपा, काँग्रेस, सेना पुरस्कृत पॅनलची सत्ता आहे. विरोधात काँग्रेस व बसपासमर्र्थित पॅनेल विरोधात आहेत. येथे ओबीसी महिला वर्गासाठी सरपंचपद राखीव आहे. ग्रामपंचायत सूत्रानुसार मागील महिन्यात ग्रामपंचायतची मासीक सभा १४ आॅगस्टला घेण्यात आली होती. यात १२ सदस्य सभेला उपस्थित होते. उपस्थितांपैकी सीताराम बावनगडे यांनी येथील सभेदरम्यान कर्मचारी ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी गैरवर्तणूक केल्याप्रकरणी ग्रामपंचायत अधिनियम ३९ नुसार १२-१ मध्ये ठराव घेण्यात आला. यादरम्यान गैरअर्जदार सीताराम बावनगडे हे दोन तास सभेत उपस्थित राहून सभा पूर्ण होण्याआधीच निघून गेले होते. याचा वचपा काढण्यासाठी गैरअर्जदार यांनी दि. १४ आॅगस्ट ते ११ सप्टेंबर दरम्यान ग्रामपंचायत सदस्या प्रीती बागडे यास ग्रामपंचायत सदस्य सीताराम बावनगडे यांनी भ्रमणध्वनीद्वारे शिवीगाळ करीत मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी फिर्यादी बागडे यांनी गैरअर्जदार विरुद्ध जवाहरनगर पोलिसात तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली. पोलिसात गैरअर्जदार विरुद्ध भादवि ५०८, ५०४, ५०६ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तपास पोलीस हवालदार टिचकुले करीत आहेत. (वार्ताहर)