गाव विकासासाठी ठाणा गावाची निवड
By Admin | Updated: October 11, 2016 00:34 IST2016-10-11T00:34:40+5:302016-10-11T00:34:40+5:30
भंडारा तालुका अंतर्गत पाच हजार लोकसंख्यापेक्षा जास्त असलेल्या गावांमधुन नागरी सुविधा योजनाद्वारे ...

गाव विकासासाठी ठाणा गावाची निवड
जवाहरनगर : भंडारा तालुका अंतर्गत पाच हजार लोकसंख्यापेक्षा जास्त असलेल्या गावांमधुन नागरी सुविधा योजनाद्वारे विकसीत गाव करण्यासाठी दोन ग्रामपंचायतची निवड जिल्हा परिषद भंडारा यांनी केली. यात ठाणा पेट्रोलपंप व गणेशपूर यांचा समावेश आहे.
गावातील नागरिकांच्या दिर्घ काळातील ज्वलंत समस्यांचे निराकरण करणाच्या हेतुने, केंद्र व राज्य शासनाच्यावतीने स्मार्ट सिटी या धर्तीवर विकसीत ग्रामपंचायत करण्यासाठी भंडारा जिल्हा परिषद अंतर्गत तालुक्यातील पाच हजार लोकसंख्या असलेल्या दोन ग्रामपंचायतीची नागरी सुविधासाठी निवड करण्यात आली. यात ग्रामपंचायत ठाणा पेट्रोलपंप व ग्रामपंचायत गणेशपूर यांचा समावेश आहे. यामध्ये गावामध्ये पुढील पंधरा वर्षामध्ये समसयांचे निराकरण करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. यासाठी चंद्रपूर येथील हर्षल ग्रामीण विकास संस्थाची गावाचे नियोजन करण्यासाठी सर्वेक्षणाचे काम सुरु करण्यात आले. यासाठी संस्थेचे बघेल व बिसेन यांनी ग्रामसभेच्या व वॉर्ड सभाच्या माध्यमातुन समस्या जाणुन घेतले. त्याप्रमाणे जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक, जिल्हा परिषद सदस्य चंद्रप्रकाश दुरुगकर, पंचायत समिती सदस्य राजेश मेश्राम, आंगणवाडी सदस्य, आशा स्वयंसेविका आरोग्य कर्मचारी यांच्याशी हितगुज करुन दिर्घकालीन विकास योजनेविषयी माहिती जाणून घेतली. ग्रामसभेच्या माध्यमातून पुढील १५ वर्षाचा गाव कृती आराखड्याच मान्यता देण्यात आले. यात शुध्द पेजल करिता स्वतंत्र जलशुध्दीकरण सयंत्र उभारणे, बंद गटर नाली तयार करणे, रस्ता मजबुतीकरण करणे, गरजु बेघराना आवास सुविधा पुरविणे, खेळाचे मैदान, दुग्ध उद्योग उभारणे, अल्पसंख्याक व दलीत वस्तीमध्ये कौशल्य विकास घडविण्यासाठी उच्च दर्जाचे औद्योगिक संस्थाची उभारणी करणे इत्यादी मुलभुत सुविधा विषय ठराव सर्वानुमते मंजुर करण्यात आले. याविषयी जिल्हा परिषद सदस्य चंद्रप्रकाश दुरुगकर, सर्वेक्षणाला आलेली चमुमधील बघेले व बिसने यांनी मार्गदर्शन केले.
सर्वेक्षणाचे कामे हे निरंतर चालु राहणार असून यात पाण्याची शुध्दता तपासणे, गावातील हवेची घनता तपासणे, घराचे सर्वेक्षण करणे, जी. आय.एस. खसरा नकाशा तयार करणे, उपग्रहाद्वारे संपूर्ण गावाची नकाशा तयार करणे, काम युध्द पातळीवर करण्यात येणार आहे. (वार्ताहर)