ठाणा पोलीस मदत केंद्र दुर्लक्षित

By Admin | Updated: August 2, 2014 23:57 IST2014-08-02T23:57:31+5:302014-08-02T23:57:31+5:30

तालुक्यातील जवाहरनगर पोलीस ठाणे अंतर्गत ठाणा पेट्रोलपंप येथे पोलीस मदत केंद्र उघडण्यात आले. मात्र कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांचा वचक नसल्याने हे केंद्र बंद अवस्थेत आहे.

Thana police help center ignored | ठाणा पोलीस मदत केंद्र दुर्लक्षित

ठाणा पोलीस मदत केंद्र दुर्लक्षित

जवाहरनगर : तालुक्यातील जवाहरनगर पोलीस ठाणे अंतर्गत ठाणा पेट्रोलपंप येथे पोलीस मदत केंद्र उघडण्यात आले. मात्र कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांचा वचक नसल्याने हे केंद्र बंद अवस्थेत आहे. परिणामी परिसरात चोरांना व अवैध व्यावसायीकांना रान मोकळे झाले. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.
राष्ट्रीय महामार्गावर अपघाताच्या प्रमाणात वाढ होत होती. रस्त्यालगत असणाऱ्या गावात चोरी करणारे भामटे महामार्गावरुन पळून जात होते. अपघात, चोरी, डकेती, अपराधीत घटना झाल्यास फिर्यादींना राष्ट्रीय महामार्गापासून चार ते सहा किलोमीटर अंतर पार करुन पोलीस स्टेशन जवाहरनगर गाठावे लागत होते. परिणामी जनतेला वेळेवर योग्य न्याय मिळत नव्हते.
जनतेला व महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहतुकदारांना कमालीचा त्रास सहन करावा लागत होता. या बाबीची दखल घेत दिनदयाल देशभ्रतार यांच्या प्रयत्नाने २००६ मध्ये शासनाने मदत केंद्राची निर्मिती करण्यात आली होती.
त्यानुसार खराडी, खरबी (नाका), चिखली, ठाणा पेट्रोलपंप करीता एक बिट पोलीस हवालदार व शिपाई तर नांदोरा, शहापूर, गोपीवाडा, उमरी, फुलमोगरा, अशोकनगर अंतर्गत एक बीट पोलीस हवालदार व शिपाई आणि एक पीएसआई ची नियुक्ती करण्यात आली. त्यानुसार गृह खात्याकडून विश्रांती घेण्यासाठी व दैनिक व्यवहाराकरीता कपाट, टेबल, वायरलेस सेट आदी आवश्यक साहित्य पुरवठा करण्यात आला होता.
मागील पाच-सहा महिन्यांपासून पोलीस मदत केंद्र उघडले नाही. त्यामुळे ते धुळखात पडलेले आहे. ग्रामपंचायत ठाणा पेट्रोलपंपने उपलब्ध करून दिलेल्या इमारतीच्या खिडक्यांची काचांची तोडफोड झालेली आहे. या ठिकाणी फक्त २६ जानेवारी, १ मे व १५ आॅगस्ट रोजी ध्वजारोहण करण्यात येते. याच वेळेस फक्त पोलीस मदत केंद्र सुरू करतात.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासठी ठाणा येथील बंद पोलीस मदत केंद्र सुरू करण्याची नितांत गरज आहे. जवाहरनगर येथे दोन एपीआय, एक पीएसआय दर्जाचे अधिकारी असून ३६ कर्मचारी आहेत. ठाणा टी पॉर्इंट हे संवेदनशिल स्थळ असल्याने येथे कायमस्वरुपी रस्ता वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Thana police help center ignored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.