शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

तुमसरचे भाजप आमदार चरण वाघमारे यांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2019 16:58 IST

महिला पोलीस उपनिरीक्षक विनयभंग प्रकरण

भंडारा : तुमसरचे भाजप आमदार चरण वाघमारे यांना महिला पोलिस उपनिरीक्षक विनयभंग प्रकरणात शनिवारी सकाळी पोलिसांनी भंडारा येथील त्यांच्या निवासस्थानावरुन अटक केली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार वाघमारे यांना अटक झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.  तुमसर येथील न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

तुमसर येथे बांधकाम कामगार किट वितरणप्रसंगी आमदार चरण वाघमारे व भाजप शहराध्यक्ष अनिल जिभकाटे यांनी महिला पोलीस उपनिरीक्षक आला शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सदर महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या तक्रारीवरून विनयभंगासह विविध गुन्हे १८ सप्टेंबर रोजी तुमसर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आले होते. त्यानंतर आमदार वाघमारे आपल्या समर्थकांसह पोलीस ठाण्यात धडकले होते. याप्रकरणाची चौकशी करून मला अटक करा अशी मागणी केली होती. त्यावेळी पोलिसांनी चौकशीसाठी पाच दिवसाचा अवधी मागून घेतला होता.

 दरम्यान शनिवारी सकाळी या प्रकरणाच्या तपास अधिकारी तथा पवनीच्या उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख रवींद्र मानकर यांच्यासह पोलिसांचे पथक आमदार वाघमारे यांच्या खात रोडवरील निवासस्थानी धडकले. त्यांना ताब्यात घेऊन भंडारा शहर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकिय तपासणी करुन दुपारी ३ वाजताच्या सुमारास तुमसर येथील न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान तुमसर भाजप शहर अध्यक्ष अनिल जिभकाटे यांना तुमसर पोलिसांनी अटक केली.

आमदार चरण वाघमारे यांना  अटक झाल्यानंतर भंडारा पोलीस ठाणे आणि तुमसर पोलीस ठाण्याबाहेर पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता.

 

जामीन घेण्यास नकार  आमदार चरण वाघमारे यांना अटक केल्यानंतर तुमसर येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी आनंद बोरकर यांच्यापुढे हजर करण्यात आले.  न्यायालयाने ११ ऑक्टोबरपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी दिली. त्यावेळी समर्थकांनी जामिनासाठी अर्ज करण्याचा प्रयत्न केला. मात्र आमदार वाघमारे यांनी त्यांना थांबवित जमीन घेण्यासाठी नकार दिला. पोलिसांनी आमदार चरण वाघमारे यांची रवानगी भंडारा कारागृहात केली.

टॅग्स :MLAआमदार