राष्ट्रवादी काँग्रेसचा थाळीनाद मोर्चा
By Admin | Updated: October 31, 2015 01:30 IST2015-10-31T01:30:30+5:302015-10-31T01:30:30+5:30
भंडारा तालुका व शहर यांच्या संयुक्तवतीने आज जिल्हा कार्यालय मधून वाढती महागाई डाळ व भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा, ....

राष्ट्रवादी काँग्रेसचा थाळीनाद मोर्चा
भंडारा : भंडारा तालुका व शहर यांच्या संयुक्तवतीने आज जिल्हा कार्यालय मधून वाढती महागाई डाळ व भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा, धानाला व ऊसाला भाव देण्याकरिता थाळीनाद मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला.
निवासी जिल्हाधिकारी प्रविण महाजन यांना निवेदन देण्यात आले. या मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश महासिचव धनंजय दलाल, जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, माजी राज्यमंत्री नाना पंचबुध्दे, नगराध्यक्ष बाबुराव बागडे, जिल्हा परिषद सदस्य ज्योती खवास, उत्तम कळपाते, नंदू झंझाड, नितीन तुमाने, विनय पशिने, भगवान बावनकर, सुजाता फेंडर, मनिषा वाघमारे, सुनिता नागदेवे, राजेश मेश्राम यांनी केले.
यावेळी अनिल जैन, प्रभात गुप्ता, धनंजय सपकाळ, गुणवत काळबांडे, सोपान आजबले, हितेश सेलोकर, राजपुत, धनराज साठवणे, रुबी चढ्ढा, स्वप्नील नशिने, जुमाला बोरकर, राजु हेडाऊ, ज्योती टेंभुर्णे, मिना कुरंजेकर, निलिमा गाढवे, हर्षिला वैरागडे, अनुसया उईके, मोनु गोस्वामी, बाळा गभणे, मनिष वासनिक, किर्ती गणविर, हाजी सलाम, कविता भोंगाडे, रुपेश खवास, फैझल पटेल, पंकज ठवकर, बबलु खान यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)