एसटी बसच्या धडकेत कापड व्यापारी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 05:00 IST2021-02-12T05:00:00+5:302021-02-12T05:00:52+5:30
प्रकाश बाळकृष्ण हटनागर (४०) रा.सानगडी (ता.साकोली) असे मृताचे नाव आहे. प्रकाश हटनागर गुरुवारी फटाक्याच्या दुकानाचा परवाना नुतनीकरणासाठी भंडारा येथे दुचाकीने जात होते. लाखनीजवळ देवरीवरुन नागपूरकडे जाणाऱ्या एसटी बसने (एमएच ४० एल ८८१९) दुचाकीला मागून धडक दिली. तो खाली कोसळला आणि त्याचवेळी एसटीचे चाक त्याच्या डोक्यावरुन गेल्याने जागीच मृत्यू झाला.

एसटी बसच्या धडकेत कापड व्यापारी ठार
लाेकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : भरधाव एसटी बसने दुचाकीला मागून धडक दिल्याने कापड व फटाका व्यापारी जागीच ठार झाल्याची घटना लाखनी येथे राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी सकाळी ११.३० वाजता घडली.
प्रकाश बाळकृष्ण हटनागर (४०) रा.सानगडी (ता.साकोली) असे मृताचे नाव आहे. प्रकाश हटनागर गुरुवारी फटाक्याच्या दुकानाचा परवाना नुतनीकरणासाठी भंडारा येथे दुचाकीने जात होते. लाखनीजवळ देवरीवरुन नागपूरकडे जाणाऱ्या एसटी बसने (एमएच ४० एल ८८१९) दुचाकीला मागून धडक दिली. तो खाली कोसळला आणि त्याचवेळी एसटीचे चाक त्याच्या डोक्यावरुन गेल्याने जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती होताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची माहिती लाखनी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. बसचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक अमोल तांबे तपास करीत आहेत. प्रकाशच्या मागे पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.
लाखनी येथे उड्डाणपुलाचे बांधकाम सुरु आहे. त्यामुळे येथे वाहतुकीची नेहमी कोंडी होते. अनेक अपघातही घडतात. सुरक्षेची कोणतीही जबाबदारी संबंधित कंपनीने घेतली नाही. रस्ता सुरक्षा सप्ताहात हा अपघात झाला असुन या अपघाताला जबाबदार कोण असा प्रश्न आहे.