शिक्षक हा समुपदेशक असावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2015 00:25 IST2015-09-02T00:25:23+5:302015-09-02T00:25:23+5:30
आजचा विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी शिकत आहे. मात्र त्या शिक्षणाचा आपल्या जीवनात खरच उपयोग होणार आहे काय?

शिक्षक हा समुपदेशक असावा
प्रबोध येळणे यांचे प्रतिपादन, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
भंडारा : आजचा विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी शिकत आहे. मात्र त्या शिक्षणाचा आपल्या जीवनात खरच उपयोग होणार आहे काय? शिक्षणातून सुखी जीवन प्राप्त करता येईल काय? हा विचार सोडून विद्यार्थी फक्त शिक्षण घेत आहे.
रट्टा मारून प्रथमही येईल, परंतु यथार्थ शिक्षण प्राप्त केल्यास त्यातून बोधही मिळेल व सुखी जीवन जगण्याचा मार्गही. यासाठी शिक्षकाने समुपदेशकाची भूमिका वटविणे काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रबोध येळणे (नागपूर) यांनी केले.
येथील गणित विषयाचे प्राध्यापक सचिन जयस्वाल व त्यांच्या चमूने विद्यार्थ्यांसाठी नि:शुल्क आयोजित केलेल्या ''स्पिरीट्युआॅलिटी व सक्सेस'' या विषयावर आधारित कार्यशाळेत डॉ. येळणे बोलत होते. यावेळी मंचावर प्रा.सचिन जयस्वाल, डॉ. अरूंधती, प्रा. प्रमोद तिडके आदी उपस्थित होते.
डॉ. येळणे म्हणाले, कुठलाही विद्यार्थी मानसीकरित्या खचला न पाहिजे याची विशेष जबाबदारी शिक्षकांसह पालकांनी घेणे गरजेचे आहे. पिढी साक्षर झाली म्हणजे समाजातील गुन्हेगारी कमी होईल, तणाव कमी होईल, असे सर्वेक्षणाअंती वाटत होते.
परंतु आजची स्थिती बघता साक्षरता वाढली असली तरी समाजातून तणाव कमी झालेला दिसून येत नाही.
कुटुंबातील सौहार्द, एकोपा, प्रेम कमी होत चालले आहे. शिक्षकही शिकविण्यात व्यस्त आहे, मात्र स्वत: शिकण्याकडे वेळ नाही. शिक्षण क्षेत्रात 'वर्क ईज वर्शिप' झाले पाहिजे तरच खऱ्या अर्थाने समाजात सुधारणा होवू शकते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी 'डबल बेस्ट' चा सल्ला दिला. यात 'ब्रेथवेल, बाथवेल, ईटवेल, एक्सरसाईज वेल, स्लीप वेल, स्टडी वेल, टाईमवेल व टेकनिक्स वेल'चे सुत्र सांगितले. प्रास्ताविक सचिन जयस्वाल यांनी तर संचालन सनोवर खान, राज कटकवार, सरगम ठाकरे व जुही क्षीरसागर यांनी केले. कार्यशाळेला मोठ्या संख्येने विद्यार्थी तथा पालकगण उपस्थित होते. (प्रतिनिधी)