शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
5
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
6
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
7
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
8
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
9
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
10
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
11
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
12
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
13
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
14
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
15
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
16
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
17
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
18
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
19
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
20
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी

शिक्षकांचे वेतन अडविले जाणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 6:00 AM

एक तारखेच्या नियमित वेतनाबाबत ज्या स्तरावर वेतन अडेल त्या अधिकारी, कर्मचारी यांचेवर कार्यवाही करण्यात येईल, तसेच शिक्षणाधिकारी, पे युनिट, बँक अधिकारी यांची संयुक्त सभा घेण्यात येईल, वैद्यकीय व थकबाकी देयके, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन प्रकरणे तत्काळ निकाली काढणे, वर्धीत मान्यता व आरटीई शाळा मान्यता प्रकरणी कोणत्याही शाळेचे वेतन अडविले जाणार नाही, ...

ठळक मुद्देशिक्षणाधिकारी : भंडारा येथे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची तक्रार निवारण सभा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : खासगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांच्या विविध प्रलबिंत समस्या व एक तारखेच्या वेतनाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळासोबत शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रवींद्र काटोलकर यांच्या कक्षात गुरुवारी तक्रार निवारण सभा घेण्यात आली. यावेळी वर्धीत मान्यता व शाळा मान्यताप्रकरणी कोणत्याही शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांचे वेतन अडले जाणार नाही, असे आश्वासन शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले.याशिवाय एक तारखेच्या नियमित वेतनाबाबत ज्या स्तरावर वेतन अडेल त्या अधिकारी, कर्मचारी यांचेवर कार्यवाही करण्यात येईल, तसेच शिक्षणाधिकारी, पे युनिट, बँक अधिकारी यांची संयुक्त सभा घेण्यात येईल, वैद्यकीय व थकबाकी देयके, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन प्रकरणे तत्काळ निकाली काढणे, वर्धीत मान्यता व आरटीई शाळा मान्यता प्रकरणी कोणत्याही शाळेचे वेतन अडविले जाणार नाही, असे मान्य केले, वरिष्ठ व निवड श्रेणी प्रस्तावातील मराठी संगणक परीक्षा, संस्थेचा ठराव, शाळा कायम मान्यता प्रमाणपत्र, संस्थेत वाद नसल्याचे प्रमाणपत्र आदी जाचक अटी रद्द करण्यात आल्या, सेवानिवृत्त मुख्याध्यापक व कर्मचाऱ्यांची सातवे वेतन आयोगानुसार अर्जित रजा रोखीकरण फरकाचे देयके मंजूर करण्यात येतील, स्नेहा कन्या विद्यालय पिंपळगाव येथील शिक्षक कर्मचारी यांचे सुधारीत वेतन निश्चितीबाबत शिक्षण उपसंचालक यांचे आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल, सहायक शिक्षक बी.आर. मेश्राम यांची गॅ्रज्युएटी मंजूर करण्यात आली. २० टक्के टप्पावरील शाळा शिक्षकांचे नियमित वेतन मंजूर करण्यात आले, सेवानिवृत्त मुख्याध्यापक यादव खोब्रागडे यांचे पेंशन प्रकरण मंजूर करण्यात आले, तथागत विद्यालयातील लिपीक देवीदास गजभिये यांचे मृत्यु पश्चात त्याचे वारसांना देय असलेली दहा लक्ष अनुदान राशीचे सुधारीत प्रस्ताव मंजूर केले जाईल.सेवानिवृत्त शिक्षक श्रीधर खेडकर यांचे निवड श्रेणी प्रस्ताव सादर करणेबाबत शाळेला पत्र देण्यात येईल, कर्मचाºयांच्या वेतनातून अवैधारित्या पैसे कपात करुन वसूली करणारे विकास हायस्कूल खरबीचे मुख्याध्यापकाची चौकशी जिल्हा परिषदचे लेखाधिकारी मार्फत केली जाईल, कस्तूरबा गाँधी विद्यालयातील नियमबाहय प्रशासकीय अधिकार वापरुन हेराफेरी करणाऱ्यांची शिक्षणाधिकारी चौकशी करुन कार्यवाही करतील, भागिरथा भास्कर हायस्कूल टवेपार व भंडारा येथील शिक्षक कर्मचारी यांचे नियमित वेतन सुरु करुन सहा महीने ते पुढील आदेशापर्यंत ज्येष्ठ शिक्षकाला प्रभारीचे आर्थिक अधिकार देण्यात यावे, आदी विषयावर सकारात्मक चर्चा करण्यात आलीयावेळीजिल्हा परिषद शिक्षण विभागाचे अधीक्षक मेश्राम, वेतन पथक अधीक्षक मेश्राम, लेखाधिकारी शिक्षण बोरकर तसेच विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबले, अविनाश बडे, जिल्हाध्यक्ष सुधाकर देशमुख, जिल्हा कार्यवाह राजेश धुर्वे, चन्द्रशेखर रहांगडाले, टेकचंद मारबते, पुरुषोत्तम लांजेवार, धीरज बांते, अनिल कापटे, पंजाब राठोड, अनंत जायभाये, भाऊराव वंजारी,दिनकर ढेंगे, बी. एस. नाकाडे, डी. पी. सोनकुसरे, ए. पी. पुस्तोडे, आर. आर. डे, रोहित मरस्कोल्हे, बी. आर. मेश्राम, यांच्या अनेक पदाधिकारी, शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Teacherशिक्षक