वेतन रखडल्याने शिक्षक संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 21:26 IST2018-10-24T21:26:27+5:302018-10-24T21:26:48+5:30
तालुक्यातील आदिवासी शिव विद्यालय तथा बाबुराव मडावी कनिष्ठ महाविद्यालयात नियमित मुख्याध्यापक नसल्यामुळे शालेय कामकाजात अडथळा निर्माण होत आहे. तसेच आॅगस्टपासून वेतन रखडल्याने शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. दरम्यान शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देवून तीन नोव्हेंबरपासून साखळी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

वेतन रखडल्याने शिक्षक संकटात
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : तालुक्यातील आदिवासी शिव विद्यालय तथा बाबुराव मडावी कनिष्ठ महाविद्यालयात नियमित मुख्याध्यापक नसल्यामुळे शालेय कामकाजात अडथळा निर्माण होत आहे. तसेच आॅगस्टपासून वेतन रखडल्याने शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. दरम्यान शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देवून तीन नोव्हेंबरपासून साखळी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
प्रभारी मुख्याध्यापक ई.एस. बडवाईक यांनी नियमित मुख्याध्यापकांचे आदेश शिक्षणाधिकारी यांनी दिले होते. परंतु भारतीय आदिवासी शिव शिक्षण संस्था गराडातर्फे जयपाल वनवे यांनी शिक्षणाधिकारी यांना पत्र देवून नियमित मुख्याध्यापकांचे आदेश रद्द करून घेतले. त्यानंतर शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाल्याने प्रभारी मुख्याध्यापकांचे अधिकार बडवाईक यांना देण्यात आले. त्यांची मुदत १० आॅक्टोबरला संपलेली आहे. त्यामुळे विद्यालयात प्रभारी मुख्याध्यापक नसल्याने शाळेचे कामकाज चालविणे कठीण झाले आहे. तीन महिन्यांपासून शिक्षकांचे वेतन झालेले नाहीत. परिणामी सदर समस्या निकाली काढावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे यांना देण्यात आले. यावेळी ई.एस. बडवाईक, एस.एम. चोले, विलास कापगते, कल्पना बघेले, प्रा. ए.एम. चेटूले, प्रा. यु.पी. बावनकुळे, प्रा. सी.के. मोटघरे, गोपाल नाकाडे, राजेश पारधीकर, डी.डी. पटले, जी.जे. कामडी, प्रकाश बोपचे आदी उपस्थित होते.