शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकच प्रगत राष्ट्र करु शकतो

By admin | Updated: October 12, 2015 01:08 IST

शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी घट्ट नाते जोडले पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी अधिक वेळ देऊन त्यांना प्रगतीकडे नेले पाहिजे.

राजेश डोंगरे यांचे प्रतिपादन : अड्याळ येथे कार्यप्रेरणा शिबिरअड्याळ : शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी घट्ट नाते जोडले पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी अधिक वेळ देऊन त्यांना प्रगतीकडे नेले पाहिजे. इतर व्यावसायिक भ्रष्ट झाले तरी फारसे काही बिघडणार नाही परंतु शिक्षक भ्रष्ट झाला तर संपूर्ण राष्ट्राचा डोलाराच कोसळू शकतो. कारण शिक्षकच प्रगत राष्ट्राची संकल्पना साकार करु शकतो, असे प्रतिपादन जिल्हा परिषद उपाध्यक्ष व शिक्षण समितीचे सभापती राजेश डोंगरे यांनी केले.समूह साधन केंद्र अड्याळ येथे आयोजित पायाभूत चाचणीत्तर शिक्षकांच्या कार्यप्रेरणा शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. नुकतेच समूह साधन केंद्र अड्याळतर्फे इयत्ता १ ते ८ च्या शिक्षकांसाठी पायाभूत चाचणीत्तोर कार्यपे्ररणा शिबिराचे आयोजन ज्ञानप्रबोधिनी कक्ष अड्याळ येथे करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी उपसरपंच देवीदास नगरे होते. प्रमुख अतिथी उच्चश्रेणी मुख्याध्यापिका मंगला आदे उपस्थित होत्या. याप्रसंगी राजेश डोंगरे आणि देवीदास नागरे यांचा समूह साधन केंद्र अड्याळतर्फे यथोचित सत्कार करण्यात आला.पायाभूत चाचणीत्तर कार्यपे्ररणा शिबिराच्या आयोजनामागील सविस्तर भूमिका केंद्रप्रमुख प्रमोदकुमार अणेराव यांनी विशद केली. तसेच मान्यवरांनी आणि विविध क्षेत्रातील व्यक्तीनी शैक्षणिक उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन केले. या कार्यप्रेरणा शिबिरास केंद्रातील ८० शिक्षक उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलकंठ डेकाटे सहायक शिक्षक पिलांद्री यांनी आणि आभारप्रदर्शन फंदे सहायक शिखक गांधी विद्यालय विरली यांनी केले. कार्यक्रमासाठी यशवंत लोहकर, वैशाली देशमुख, मीनाक्षी घोडमारे, भगवान जाधव यांनी अथक परिश्रम घेतले. (वार्ताहर)