विकास गायधने यांना शिक्षक पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 22:23 IST2017-09-04T22:23:06+5:302017-09-04T22:23:25+5:30

लाखनी पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक विकास गायधने यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीने आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केला.

Teacher award for Vikas Gaudhana | विकास गायधने यांना शिक्षक पुरस्कार जाहीर

विकास गायधने यांना शिक्षक पुरस्कार जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : लाखनी पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक विकास गायधने यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीने आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केला.
राज्यस्तरीय पुरस्कार अंतिम निवड फेरीत त्यांच्या कलागुणांची व त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर केला. हा राज्यस्तरीय गुणीजन गौरव परिषदेत त्यांना या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
आॅक्टोबर महिन्यात नागपूर येथे होणाºया एका समारंभात त्यांना हा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. विकास गायधने यांनी शिक्षक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. त्यांनी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी केलेल्या भरीव कामगिरीची दखल विकास अकादमीने घेतली. त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.

Web Title: Teacher award for Vikas Gaudhana