नौटंकी करणाऱ्यांना धडा शिकवा

By Admin | Updated: January 17, 2015 22:53 IST2015-01-17T22:53:05+5:302015-01-17T22:53:05+5:30

भंडारा व गोंदिया जिल्ह्यात धान व ऊसाच्या आधारभूत किमतीकरीता मोर्चे काढणारे आता सत्तेवर येताच मौन बाळगून आहेत. मागील १५ वर्षांत विधीमंडळात न बोलता रस्त्यावर आंदोलन करून

Teach a lesson to gimmicks | नौटंकी करणाऱ्यांना धडा शिकवा

नौटंकी करणाऱ्यांना धडा शिकवा

अनिल देशमुख यांचे आवाहन : तुमसरात काँग्रेस तालुका अध्यक्षांचा राकाँत प्रवेश
तुमसर : भंडारा व गोंदिया जिल्ह्यात धान व ऊसाच्या आधारभूत किमतीकरीता मोर्चे काढणारे आता सत्तेवर येताच मौन बाळगून आहेत. मागील १५ वर्षांत विधीमंडळात न बोलता रस्त्यावर आंदोलन करून सहानुभूती मिळविली. भाजपचे आमदार व खासदार एक शब्दही बोलत नाहीत. या नौटंकी करणाऱ्यांना धडा शिकवा, असे आवाहन माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केले.
तुमसरात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे होते. अतिथी म्हणून आमदार राजेंद्र जैन, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, मधुकर सांबारे, विजय डेकाटे, नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे, जिल्हा परिषद सदस्य किरण अतकरी, नलिनी कोरडे, कल्याणी भुरे, रामदयाल पारधी उपस्थित होते.
यावेळी तालुका काँगे्रेस कमेटीचे अध्यक्ष विठ्ठल कहालकर, काँगे्रसचे पं.स. सदस्य राजेश रहांगडाले, माया गौपाले, यादोराव पटले सुखशाम येळे, कोठीराम ठवकर, शालिक गौपाले, कवळू पारधी, लाला गौपाले, शरद रेहपाडे, श्यामराव ठाकरे, किशोर परतेती, राहुल देशभ्रतार, खेमराज पंचबुद्धे यांच्यासह तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी राकाँमध्ये प्रवेश केला. त्या कार्यकर्त्यांचे देशमुख यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी आ. राजेंद्र जैन म्हणाले, देव्हाडा येथील साखर कारखान्यात केवळ १७०० ते १८०० रूपये भाव दिला जात आहे. राज्य शासनाने धानाला केवळ ५० रूपये वाढीव भाव दिला. याविरोधात खासदार, आमदार आंदोलने का? करीत नाही. असा आरोप करुन त्यांच्या करणी व कथनीत अंतर असल्याचा आरोप केला. यावेळी नाना पंचबुद्ध, राजकुमार माटे, यादोराव पटले यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक जिल्हा परिषद सदस्य विठ्ठलराव कहालकर यांनी केले. संचालन तालुका अध्यक्ष देवचंद ठाकरे यांनी तर आभारप्रदर्शन पंचायत समिती सदस्य सुधाकर कहालकर यांनी केले. यावेळी नगरसेवक राजेश देशमुख, मीना गाढवे, शिला धार्मिक, सरोज भुरे, जि.प. सदस्य सुरेश रहांगडाले, देवसिंग सव्वालाखे, पं.स. सदस्य मनोज वासनिक, विठ्ठल रहमतकर, योगेश सिंगनजुडे, रामदास बडवाईक, दिलीप सोनवाने यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Teach a lesson to gimmicks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.