शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बदलणार

By admin | Updated: September 25, 2016 00:51 IST

ऐन नगरपरिषद निवडणुकीपुर्वी साकोली तालुक्यात काँग्रेसमध्ये वादंग निर्माण झाले असून काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष बदलणार अशी चर्चा आहे.

साकोली तालुक्यात चर्चा : होमराज कापगते यांची वर्णी लागण्याची शक्यतासंजय साठवणे  साकोली ऐन नगरपरिषद निवडणुकीपुर्वी साकोली तालुक्यात काँग्रेसमध्ये वादंग निर्माण झाले असून काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष बदलणार अशी चर्चा आहे. याशिवाय आणखी काही पदावर स्थगितीचे पत्र आल्याने काँग्रेसमध्ये चर्चांना पेव फुटले आहे. या फेरबदलाचा परिणाम आगामी नगर परिषद निवडणुकीवर होईल, अशी चर्चा आहे.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीनंतर नंदकिशोर समरीत यांची तालुका अध्यक्षपदावर निवड करण्यात आली होती. त्यानंतर काही महिने काँग्रेसचा कारभार सुरळीत सुरू होता. त्यानंतर साकोली नगर परिषदेची घोषणा झाली. येत्या २७ सप्टेंबरला साकोली येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यासाठी संपूर्ण टीम कामाला लागली. या कार्यकर्ता मेळाव्याच्या तयारीवरून वाद निर्माण झाला. तालुका अध्यक्ष समरीत यांच्याशी पदाधिकाऱ्यामध्ये ‘तु तु - मै मै’ झाले. वाद इतका विकोपाला गेला की यानंतर तालुका अध्यक्ष बदलणार अशी चर्चा सुरू झाली. नवीन तालुका अध्यक्षपदी जिल्हा परिषद सदस्य होमराज कापगते यांची वर्णी लागण्याची चर्चा आहे.ही चर्चा रंगात येत नाही तीच जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिवांची प्रदेश कार्यकारीणीने तात्पुरती स्थगिती दिल्याची माहिती आहे. हा दुसरा नवीन वाद काँगे्रसमध्ये निर्माण झाला आहे. या दोन्ही प्रकरणासंदर्भात जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांनी साकोली येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक आयोजित करून कार्यकर्त्यांशी चर्चा केली.