होळी सण साजरा करतांना स्वतः ची काळजी घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:37 IST2021-03-27T04:37:27+5:302021-03-27T04:37:27+5:30
याशिवाय अनेक ठिकाणी वीजवाहिन्या भूमिगत असल्याने, त्यापासून लांब अंतरावरच होळी पेटवावी जेणेकरून होळीच्या उष्णतेपासून भूमिगत वीजवाहिन्या सुरक्षित राहतील. होळी ...

होळी सण साजरा करतांना स्वतः ची काळजी घ्या
याशिवाय अनेक ठिकाणी वीजवाहिन्या भूमिगत असल्याने, त्यापासून लांब अंतरावरच होळी पेटवावी जेणेकरून होळीच्या उष्णतेपासून भूमिगत वीजवाहिन्या सुरक्षित राहतील.
होळी पेटविताना शक्यतो मोकळ्या जागेचा वापर करा. ट्रक किंवा इतर वाहनांतून होळी आणतांना होळीचा स्पर्श रस्त्यालगतच्या वीजवाहिन्यांना होणार नाही याची खबरदारी घ्या. विजेचे अपघात हे प्राणघातक असल्याने एक चूकही अपघातास कारणीभूत ठरू शकते. रंगोत्सव साजरा करतांना पाण्याचे फवारे वीजवाहिन्यापर्यत उडणार नाही याची काळजी घ्या. रंग भरलेले फुगे फेकतांना ते विजेचे खांब आणि वीजवाहिन्यांना लागणार नाही याची खबरदारी घ्या. ओले कपडे, ओल्या चिंध्या विजेच्या तारावर फेकण्याचे टाळावे कारण अशा ओल्या कपड्यामुळे दोन फेजमध्ये शॉर्ट सर्किट होऊन वीजपुरवठा खंडित होतो.
तसेच वीज तारांवर अशा कपड्यांमुळे पावसाळ्यात दोन फेज मध्ये शॉर्ट सर्किट होऊन वीजपुरवठा खंडित होतो.
विशेषत: बालकांना रंगोत्सव साजरा करतांना सांभाळून व मोठ्यांच्या निगराणीखाली वीज यंत्रणापासून लांब ठेवून साजरा करू द्यावा. वीज वितरण यंत्रणेचे रोहित्रे व तत्सम वितरण उपकरणे बसविलेल्या जागेपासून लांब अंतारावरच रंग खेळा. रंग खेळताना ओल्याचिंब शरीराने वीज खांबाला स्पर्श झाल्यास अपघाताचा संभाव्य धोका असल्याने विजेचा खांबांना स्पर्श करू नका. विजेच्या खांबासभोवती पाण्याचा निचरा होणार नाही. याची खबरदारी घ्या. होळीचा सण हा आनंदाचा रंगोत्सव असल्याने खबरदारी घेऊन होळीचा आनंद सांभाळून करण्याचे आवाहन बारव्हा महावितरण कार्यालयात कार्यरत कनिष्ठ अभियंता सुरज भर्रे यांनी केले आहे