शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

तहसील कार्यालय वाऱ्यावर!

By admin | Updated: June 7, 2015 00:48 IST

गतिमान प्रशासनाचा दावा करणारा महसूल विभागात शनिवारी तहसीलदारासह सर्वच नायब तहसीलदार, अन्न पुरवठा...

नागरिकांना मनस्तापतहसीलदारांसह नायब तहसीलदारांची बैठकांना उपस्थितीतुमसर : गतिमान प्रशासनाचा दावा करणारा महसूल विभागात शनिवारी तहसीलदारासह सर्वच नायब तहसीलदार, अन्न पुरवठा निरीक्षकांनी शासकीय बैठका असल्याने कार्यालयात अनुपस्थित होते. दुपारनंतर एकमेव नायब तहसीलदार कार्यालयात आल्याची माहिती आहे. शेकडो जणांना आल्यापावली परतावे लागले.शनिवारी कार्यालयीन वेळेत सकाळी ११ वाजता फेरफटका मारल्यावर नुकतेच रूजू झालेले तहसीलदार डी.टी. सोनेवानेसह इतर तीन नायब तहसीलसदार तहसील कार्यालयात अनुपस्थित होते. एकमेव नायब तहसीलदार अरविंद हिंगे कर्तव्यावर होते. दोन तासानंतर ते ही कामानिमित्त निघाले. परत दुपारी ते पुन्हा तहसील कार्यालयात परतले. जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी बैठक आयोजित केली होती. त्याकरिता तहसीलदार डी.टी. सोनेवाने, निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार मडावी, अन्नपुरवठा निरीक्षक भंडारा येथे बैठकीनिमित्त गेले होते.तुमसर तालुक्यातील शेकडो नागरीक विविध दाखले, प्रमाणपत्राकरिता सुमारे ४० ते ४५ कि.मी. अंतरावरून आले होते. त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक तोंडावर आली आहे. त्यानिमित्त तहसीलदारासह नायब तहसीलदार बैठकांना गेले होते. जिल्हाधिकाऱ्यांना किमान एक किंवा दोन नायब तहसीलदारांना मुख्यालयी ठेवण्याची गरज होती. नायब तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, अरविंद हिंगे यांचे स्थानांतरण झाले आहे. तहसीलदार सनि यादव, महेंद्र सूर्यवंशी यांना केवळ एक वर्षे झाले होते. त्यांचे स्थानांतरण महसूल विभागाने केले. नियमावर बोट ठेवणाऱ्या महसूल खात्याने किमान कार्यालय वाऱ्यावर सोडून जाऊ नये, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या. (तालुका प्रतिनिधी)