शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

जलतरणपटूंनो, जिल्ह्याचा नावलौकिक करा

By admin | Updated: January 12, 2016 00:41 IST

आरोग्याच्या दृष्टीने पोहण्याचा व्यायाम अत्यावश्यक मानला जातो. आंतरराष्ट्रीय स्तरावर जलतरण स्पर्धा होत असतात.

खासदार चषक : नाना पटोले यांचे प्रतिपादन, विविध गटात नाकाडे, मेश्राम, मदनकर, पशिने, शक्तीकर, पांडे अव्वलभंडारा : आरोग्याच्या दृष्टीने पोहण्याचा व्यायाम अत्यावश्यक मानला जातो. आंतरराष्ट्रीय स्तरावर जलतरण स्पर्धा होत असतात. मात्र या स्पर्धांमध्ये भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील स्पर्धक दिसत नाही. शिवणीबांध येथील जलाशयावर आयोजित खासदार जलतरण स्पर्धेच्या माध्यमातून भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील जलतरणपटूंनी यशाचे शिखर गाठून जिल्ह्याचा नावलौकीक करावा, असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले. शिवनीबांध जलतरण संघटनेच्या वतीने रविवारी साकोली तालुक्यातील शिवनीबांध येथील जलाशयावर खासदार जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार बाळा काशीवार, अतिथी म्हणून राष्ट्रीय जलतरणपटू भोजराज मेश्राम, साहसी जलतरणपटू मनोहर मुळे, वैशाली चांदेवार, दिपक मेंढे, दिनेश गुप्ता, आयोजक अध्यक्ष राजेश बांते, सचिव मनिष कापगते, डॉ. चंद्रकांत निंबार्ते, डॉ. राजेश चंदवाणी, गिरिश रहांगडाले, जनार्धन दोनोडे आदी उपस्थित होते.खासदार नाना पटोले म्हणाले साकोली तालुक्यात असलेला शिवनीबांध जलाशय निसर्गरम्य वातावरणात तयार आहे. स्पर्धेच्या माध्यमातून या जलाशयाची ओळख राज्यपातळीवर निर्माण झाली आहे. पर्यटनस्थळाच्या दृष्टीने हे स्थळ योग्य असून लवकरच ते घोषित करण्यात येईल. येत्या तीन वर्षात जलाशया संदर्भात असलेल्या समस्या दुर करण्यात येतील, असे आश्वासन दिले. स्पर्धेत २०० स्पर्धक सहभागी झाले होते. त्यांनी आपल्या कलाकौशल्य पणाला लावून पारितोषिक पटकाविले. अपंगांच्या २०० मीटर मुलींच्या स्पर्धेत प्रथम श्रुती नाकाडे, तर मुलांच्या स्पर्धेत प्रथम शुंभम मेश्राम, व्दितीय तुषार फुंडे, तर तृतीय नाशिक झंझाड यांनी प्राप्त केला. ५०० मीटर व १ किलोमिटरच्या खुल्या स्विमींग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात १० ते १६ वर्ष महिला गटात प्रथम क्रमांक सिध्दी मदनकर, द्वितीय क्रमांक चेतना बोरकर, तर तृतीय क्रमांक सरयू बिजवे यांनी पटकाविला. १० ते १४ वर्ष मुलांच्या वयोगटात प्रथम क्रमांक पियाशु पशिने, द्वितीय हर्षद सोनवाने, तृतीय उत्कर्ष हर्षे. १५ ते २५ वर्ष वयोगटात प्रथम कृणाल शक्तीकर, द्वितीय जय बावणकुळे, तृतीय राघवेंद्र कापगते. २६ ते ४० वयोगटात प्रथम प्रदीप वलधरे, व्दितीय मारोती भुरे, तृतीय सोनू गणविर, ४१ ते ५५ गटात प्रथम योगेश शक्तीकर, द्वितीय प्रशांत कारेमोरे , तृतीय शिवराज माळवी, तसेच ५५ ते अमर्याद वयोगटात प्रथम क्रमांक सुभाष पांडे तर द्वितीय क्रमांक परसराम फेंडरकर व तृतीय क्रमांक केशव भुरे यांनी पटकाविला.स्पर्धेचे बक्षीस वितरण माजी आमदार सेवक वाघाये यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राजेश बांते, मनिष कापगते, जनार्धन दोनोडे आदी उपस्थित होते. स्पर्धेसाठी मोरेश्वर डोये, राजेंद्र हर्षे, सुरेश लांजेवार, धनंजय हेडाऊ, रवि पंचबुध्दे, कैलाश लुटे, उमेश कठाणे, रामु कापगते, विजय साखरे, सचीन रंगारी, के.डी. टेंभरे, विनोद भेंडारकर, एकनाथ दोनोडे, विनोद हरणे यांच्यासह शिवनीबांध जलतरण संघटना साकोली, लाखनी, सानगडी, सासरा, साखरा, सावरबंध, येथील पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)