संच निर्धारणाला स्थगिती
By Admin | Updated: October 29, 2014 22:44 IST2014-10-29T22:44:48+5:302014-10-29T22:44:48+5:30
शैक्षणिक सत्र २०१३-१४ शिक्षक कर्मचारी निर्धारणाच्या विरोधात महाराष्ट्र शिक्षक परिषदेच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचिका टाकण्यात आली होती. सदर याचिकेवर

संच निर्धारणाला स्थगिती
भंडारा : शैक्षणिक सत्र २०१३-१४ शिक्षक कर्मचारी निर्धारणाच्या विरोधात महाराष्ट्र शिक्षक परिषदेच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचिका टाकण्यात आली होती. सदर याचिकेवर २९ आॅक्टोबरला न्यायायलयात सुनावणी झाली. त्यावर न्यायाधीश गवई आणि न्यायाधीश देशपांडे यांनी या निर्णयाला स्थगिती दिली. त्यामुळे सेवासमाप्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या हजारो शिक्षण सेवकांना दिलासा मिळाला आहे.
शिक्षणाचा कायद्यानुसार सत्र २०१४-१५ मध्ये सत्र २०१३-१४ ची दिलेली संचमान्यता यामुळे शिक्षक व कर्मचारी मोठ्या प्रमाणात अतिरिक्त ठरविण्यात आले. याच प्रकरणात मात्र शिक्षणसेवकांच्या सेवा समाप्त करण्याचे फर्मान जारी करण्यात आले होते. यामुळे शैक्षणिक संस्थांमध्ये भीती निर्माण झाली होती. शिक्षणसेवकांना नोकरी गमवावी लागत असल्यामुळे त्यांची दयनीय झाली होती.
यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद व अमरावती जिल्हा शाखा भंडारा यांच्या वतीने शिक्षक परिषद व अमरावती जिल्हा शाखा संघ यांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती.
सदर याचिकेवर निर्णय देत शैक्षणिक सत्र २०१३-१४ च्या कर्मचारी संच निर्णयाला स्थगिती देण्यात आली. त्यामुळे शिक्षण सेवकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शिक्षणाच्या कायद्याचा धाक दाखवत शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ठरविले जात होते.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने या विरोधात शासनाकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र शासन कोणत्याही प्रकारे निर्बंध लावत नसल्याचे लक्षात येत येताच शिक्षक परिषदेच्यावतीने याचिका दाखल करण्यात आली. शिक्षक परिषदेतर्फे अॅड. आनंद परचुरे यांनी बाजू मांडली. शिक्षक परिषदेच्या मागणीसाठी आमदार नागो गाणार, डॉ. उल्हास फडके, अंगेश बेहलपांडे, अशोक तेलपांडे, अशोक वैद्य, कांचन गहाणे, डी.एफ. वानी, पी.एम. नाकाडे, राधेश्याम धोटे यांनी पुढाकार घेतला होता. (शहर प्रतिनिधी)