शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

वीज वितरणच्या निलंबित कर्मचाऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 1:19 AM

वडिलांच्या निधनानंतर अनुकंपा तत्वावर वीज वितरण कंपनीत लागलेल्या आणि अलिकडेच निलंबित झालेल्या एका तरूण लाईनमनने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना पवनी तालुक्यातील कोसरा (कोंढा) येथे सोमवारी सायंकाळी उघडकीस आली.

ठळक मुद्देकोसराची घटना : घरातील पंख्याला दोर बांधून लावला गळफास

लोकमत न्यूज नेटवर्ककोंढा (कोसरा) : वडिलांच्या निधनानंतर अनुकंपा तत्वावर वीज वितरण कंपनीत लागलेल्या आणि अलिकडेच निलंबित झालेल्या एका तरूण लाईनमनने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना पवनी तालुक्यातील कोसरा (कोंढा) येथे सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. त्याने घरातील पंख्याला नॉयलॉनच्या दोराने बांधून गळफास लावून घेतला.संजय रामदास काळे (२६) असे मृत लाईनमनचे नाव आहे. त्याचे वडील रामदास काळे वीज वितरण कंपनीत लाईनमन म्हणून कार्यरत होते. आठ वर्षापुर्वी त्यांच्या वडिलांचे आजारपणाने निधन झाले. त्यामुळे संजयला अनुकंपा तत्वावर नोकरी मिळाली होती. तो कोसरा येथील वीज वितरण कार्यालयात कार्यरत होता. त्यानंतर त्याचे स्थानांतरण पवनी येथे करण्यात आले. तेथे असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत वाद व इतर कारणावरून त्याला निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे तो खचला होता. त्यातच आर्थिक चणचण जाणवत होती. अनेकांकडून त्याने उसणवार पैसे घेतले होते. पैसे परत करण्याच्या विवंचनेने कायम तणावात राहत होता. अशातच त्याला व्यसनही लागले. दोन दिवसापुर्वी आई व लहान बहीण बाहेरगावी गेली. त्यामुळे तो एकटाच घरी होता. सोमवारी सायंकाळी संजय अद्याप का उठला नाही म्हणून परिसरातील नागरिकांनी खिडकीतून डोकावून पाहिले तेव्हा तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती अड्याळ पोलिसांना देण्यात आली. मंगळवारी दुपारी १ वाजता त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत्युपूर्वी त्याने चिठ्ठ्या लिहिल्या असून त्या अड्याळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नेमके या चिठ्ठीत काय लिहिलेले आहे हे मात्र कळू शकले नाही. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुरेश ढोबळे करीत आहे. वडिलांच्या निधनानंतर आईचा एकमेव आधार असलेल्या संजयने आत्महत्या केल्याने आईवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :Deathमृत्यू