चारगाव येथील १५ घरांना पुराचा वेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 06:00 AM2019-09-11T06:00:00+5:302019-09-11T06:00:46+5:30

मंगळवारी सकाळी पावसाने उसंत दिली. परंतु पुन्हा सायंकाळपासून पावसाला सुरुवात झाली. वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. मध्यप्रदेशातील अतिवृष्टीचा फटका तुमसर तालुक्याला बसत आहे. नदीकाठावरील ब्राम्हणी गावात पाणी शिरले.

Surrounding four houses in Chargaon | चारगाव येथील १५ घरांना पुराचा वेढा

चारगाव येथील १५ घरांना पुराचा वेढा

googlenewsNext
ठळक मुद्देब्राम्हणीत पाणी शिरले : वैनगंगा फुगली

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : मध्यप्रदेशात झालेल्या मुसळधार पावसाने वैनगंगा नदीला पूर आला असून या पुराचा फटका तुमसर तालुक्यातील नदीतिरावरील गावांना बसत आहे. ब्राम्हणी चारगाव येथे गावात पाणी शिरले असून चारगाव येथील १५ कुटुंबांना धोका निर्माण झाला होता. महसूल प्रशासनाने त्यांना रात्रीच सुरक्षित स्थळी हलविले.
मंगळवारी सकाळी पावसाने उसंत दिली. परंतु पुन्हा सायंकाळपासून पावसाला सुरुवात झाली. वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. मध्यप्रदेशातील अतिवृष्टीचा फटका तुमसर तालुक्याला बसत आहे. नदीकाठावरील ब्राम्हणी गावात पाणी शिरले. चारगाव येथील कोळी बांधवांच्या घराला पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. सीतेपार येथे जाणाऱ्या नाल्याचे पाणी तीन फुटावरुन वाहत आहे. गावचा संपर्क तुटल्याची माहिती सरपंच गजानन लांजेवार यांनी दिली. चारगाव येथे सोमवारी रात्री मंडळ अधिकारी एम.एम. हुकरे, तलाठी रामटेके यांनी दहा ते बारा कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविले, अशी माहिती माडगीचे उपसरपंच संजय अटराये यांनी दिली. ब्राम्हणी येथे महसूल प्रशासनाचे कर्मचाºयाने भेट दिल्याची माहिती उपसरपंच युवराज बुधे यांनी दिली. सध्या वैनगंगेने धोक्याची पातळी ओलांडली आहे. माडगी शिवारात नदीतिरावरील विजेच्या तारा नदीपात्रात लोंबकळत होत्या. त्यामुळे वीज प्रवाह बंद करण्यात आला. मंगळवारी सायंकाळपासून पुन्हा झोडपने सुरु केले. महसूल प्रशासन पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. नागरिकात भीतीचे वातावरण आहे.

वैनगंगेत अनोळखी तरुणीचा मृतदेह
पवनी तालुक्यातील वैनगंगा नदीच्या मौदी येथील डोंगेघाटावर २० ते २५ वर्ष वयोगटातील एका तरुणीचा मृतदेह आढळून आला. अद्याप तिची ओळख पटली नाही. ती पुरात वाहून आली असावी असा अंदाज आहे. याबाबत अड्याळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली. तर लाखांदूर तालुक्यातील कुडेगाव येथील शेतशिवारात शेतकरी बबन जयराम कांबडी (६०) याचा मृतदेह आढळून आला.

Web Title: Surrounding four houses in Chargaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.