सर्वशिक्षा अभियानांतर्गत ७२९ विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रिया
By Admin | Updated: September 20, 2014 23:43 IST2014-09-20T23:43:23+5:302014-09-20T23:43:23+5:30
सन २००४-०५ मध्ये प्रारंभ झालेल्या सर्वशिक्षा अभियानांतर्गत आतापर्यंतच्या आठ वर्षात जिल्ह्यातील ७२९ विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत. यात अस्थिव्यंग, कर्णबधिर व दृष्टीदोष

सर्वशिक्षा अभियानांतर्गत ७२९ विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रिया
निधी झाला बंद : यावर्षी बसणार फटका
प्रशांत देसाई - भंडारा
सन २००४-०५ मध्ये प्रारंभ झालेल्या सर्वशिक्षा अभियानांतर्गत आतापर्यंतच्या आठ वर्षात जिल्ह्यातील ७२९ विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत. यात अस्थिव्यंग, कर्णबधिर व दृष्टीदोष या प्रवर्गातील शस्त्रक्रियांचा समावेश आहे. शासनाच्या या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना चांगलाच लाभ झाला. परंतु यावर्षीपासून अशा शस्त्रक्रियेसाठी देण्यात येणारा निधी बंद करण्यात आल्यामुळे आता शस्त्रक्रिया कशा होतील, हा प्रश्न अनुत्तरीत राहणार आहे.
सन २००४-२००५ मध्ये सर्वशिक्षा अभियानाची सुरूवात झाली. या अभियानाच्या माध्यमातून शाळाबाह्य व अपंग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शोधून त्यांना शाळेत दाखल करणे. त्यांच्यात अस्थिव्यंग, कर्णबधिर व दृष्टीदोष असलेल्या विद्यार्थ्यांना शोधून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणे असा त्यामागील हेतू आहे. मागीलवर्षी सर्वशिक्षा अभियानांतर्गत ७२९ विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. यावर्षी शासनाने हा निधी बंद केल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या शस्त्रक्रिया रखडलेल्या आहेत.
अनेक विद्यार्थी शाळाबाह्य असल्याचा प्रकार शिक्षण विभागाला दिसून आला. यातील अनेक विद्यार्थी अपंग प्रवर्गात असल्याने पालकांचेही त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे प्रकरण समोर आले. त्यामुळे शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाने अनेक योजना अंमलात आणल्या. त्या अनुषंगाने समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाचा लाभ मिळावा, यासाठी शिक्षण विभागाने अपंग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मदतनिस व दूर अंतरावरील शाळेत त्यांना पोहोचविण्यासाठी मदतनिस देऊन त्यांना ३०० महिन्याकाठी भत्ता देण्यात येत होता.
शैक्षणिक सत्राच्या १० महिन्यासाठी हा मदतनिस भत्ता देण्यात येतो. यावर्षी सन २०१४-१५ साठी सर्वशिक्षा अभियानातंर्गत २०६ विद्यार्थ्यांसाठी २०६ मदतनिसांची नियुक्ती करण्यात आली. हे मदतनिस अपंग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना त्यांच्या घरून शाळेत आणतात. शाळा सुटल्यानंतर परत घरी पोहोचवितात. यासोबतच बाहेरगावी शिक्षणासाठी जाणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणीसाठी मदत व्हावी, बाहेरगावी शिक्षण घेणाऱ्या ६८ विद्यार्थ्यांसाठी मदतनिस नियुक्त करण्यात आले आहे.
त्यांनाही महिन्याकाठी ३०० रूपये प्रवासभत्ता देण्यात येतो. सर्वशिक्षा अभियानांतर्गत यावर्षी बुध्दीतपासणी करण्यात आली. यात २५० विद्यार्थी कमजोर असल्याचे निष्पन्न झाले.