सुनील खिलोटे यांना आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2019 21:58 IST2019-01-27T21:58:00+5:302019-01-27T21:58:14+5:30
महाराष्ट्र राज्य क्रीडा शिक्षक महासंघातर्फे पहिल्यांदाच आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कारांची घोषणा शारीरिक शिक्षण दिनाचे औचित्य साधून अहमदनगर येथे करण्यात आली.

सुनील खिलोटे यांना आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : महाराष्ट्र राज्य क्रीडा शिक्षक महासंघातर्फे पहिल्यांदाच आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कारांची घोषणा शारीरिक शिक्षण दिनाचे औचित्य साधून अहमदनगर येथे करण्यात आली. यात जिल्हयातून एकमेव भंडारा शहरातील लाल बहादूर शास्त्री विद्यालय येथील क्रीडाशिक्षक सुनील आर. खिलोटे यांची निवड करण्यात आली आहे. क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना राज्य शासन पुरस्कृत करते तसाच पायंडा महासंघानेही घातला आहे. खिलोटे यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.