सुंदरकांड चळवळीला सहा वर्षे पूर्ण

By Admin | Updated: August 14, 2014 23:34 IST2014-08-14T23:34:00+5:302014-08-14T23:34:00+5:30

सर्व जातीधर्म, गरीब, श्रीमंत यांच्या सीमा ओलांडून एकत्रित आलेल्या २१ महिला भाविक कुटुंबियांसोवत मागील सहा वर्षांपासून येथील हनुमंतांच्या देवस्थानात सुंदरकांडाचे पठण करीत आहेत.

The Sunderkand movement completed six years | सुंदरकांड चळवळीला सहा वर्षे पूर्ण

सुंदरकांड चळवळीला सहा वर्षे पूर्ण

अड्याळ : सर्व जातीधर्म, गरीब, श्रीमंत यांच्या सीमा ओलांडून एकत्रित आलेल्या २१ महिला भाविक कुटुंबियांसोवत मागील सहा वर्षांपासून येथील हनुमंतांच्या देवस्थानात सुंदरकांडाचे पठण करीत आहेत.
दि. ५ आॅगस्ट २००९ ला हरिओम सुंदरकांड महिला भजन मंडळाची स्थापना केली. या स्थानिक सुंदरकांड उपक्रमाला सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. सामाजिक समरसतेच्या भावनेतून बचतगट, व विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून अनेक महिलांना एकत्रित आणून सामाजिक, धार्मिक दायीत्व पार पाडत आहेत.
पवनी तालुक्यातील श्री हनुमंताचे तीर्थक्षेत्र असलेल्या अड्याळ गावामध्ये गत सहा वर्षांपासून या महिलांनी एकत्रित येऊन श्री हनुमान मंदिर येथे दर मंगळवारी व शनिवारी संगीतमय सुंदरकांड गायन करतात. कुणी गरीब कुटुंबातील या महिला सुंदरकांड गायनाला जातात. या सुंदरकांड भजन मंडळातील संपूर्ण महिलांनी एकत्रित येऊन बचत गटाची स्थापनाही केली आहे.
मंदिरातील प्रत्येक कार्यक्रमात यांचा दुसऱ्याचे जीवन अर्थपूर्ण बनविते. सामाजिक बांधीलकीतून एकमेकांच्या गरजा पुरविणे, कर्तृत्वाचा धनी कोणी झाला तर अवडंबर न माजविता त्याचा गौरव करणे, आरतीचे पैसे समाजोपयोगी कामात खर्च करणे आदी समाजोपयोगी उपक्रम या महिला करीत आहेत.
सहा वर्षामध्ये ३१२ सुंदरकांड गायन पूर्ण करण्यात आलेले आहे. या महिलांना हनुमान देवस्थान कमेटीतर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या अखंड ज्योतिकलश, नवरात्रोत्सवादरम्यान साडी-चोळी भेट देण्यात येते, असे मंदिर समितीचे अध्यक्ष भास्करराव पोटवार यांनी सांगितले. सहा वर्षे उपक्रम कधी न चुकता वेळेचे बंधन तंतोतंत पाळत आहेत.
या उपक्रमात रेणुका चांडक, नीता भोयर, नीता जोशी, शुभांगी श्रृंगारपवार, मोहिनी पेशने, सरीता चांडक, प्रिती सलुजा, विभा वसानी, निलू टावरी, माधुरी चांडक, वंदना पवार, सुशिला दलाल, मालु ब्राम्हणकर, कैलास मदान, वंदना टेप्पलवार, हेमा मदान, अर्चना उपाध्यक्ष आदींचा समावेश आहे. (वार्ताहर)

Web Title: The Sunderkand movement completed six years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.