‘सुन माझी लाडाची’ स्पर्धा २६ रोजी
By Admin | Updated: June 18, 2014 00:04 IST2014-06-18T00:04:49+5:302014-06-18T00:04:49+5:30
लोकमत सखीमंचतर्फे दि. २६ जून रोजी खास सखींकरीता ‘‘सुन माझी लाडाची’’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सखीमंच सदस्य युवती व महिला नि:शुल्क सहभागी होऊ शकतील.

‘सुन माझी लाडाची’ स्पर्धा २६ रोजी
सासु-सुन संमेलन : चार फेरींमधून होणार निवड
भंडारा :लोकमत सखीमंचतर्फे दि. २६ जून रोजी खास सखींकरीता ‘‘सुन माझी लाडाची’’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सखीमंच सदस्य युवती व महिला नि:शुल्क सहभागी होऊ शकतील. विजयी स्पर्धकांना भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.
स्पर्धेतून सासु किंवा सुन पैकी कुणीही एक सखी मंच सदस्य असणे आवश्यक आहे. अन्य तालुक्यातील स्पर्धक तालुका संयोजिकाकडे नोंदणी करतील. स्पर्धेकरीता २५ रु. शुल्क आकारण्यात येईल. स्पर्धेत चार फेरी असून प्रथम फेरी पारंपारिक वेशभुषा व परिचय, सुन माझी लाडाची, आईतुल्य सासु माझी व जोडी तुझी माझी अशाप्रकारे फेरी घेण्यात येतील. दि. २२ जूनपर्यंत तालुका संयोजिकांकडे नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी व स्पर्धेच्या अधिक माहितीकरीता जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार (८०८७१६२३५२) तालुका संयोजिका शिवानी काटकर (९७६४३९३९२६), अल्का भागवत (९०९६३२८४१९), सुचिता आगाशे (८३९०७२७७१८), रितु पशिने (९४०५३४००४९) यांच्याशी संपर्क साधता येईल.(मंच प्रतिनिधी)