विवाहितेला ठार मारून आत्महत्येचा देखावा

By admin | Published: May 24, 2017 12:17 AM2017-05-24T00:17:56+5:302017-05-24T00:17:56+5:30

पतीच्या जाचाला कंटाळून सारीका सुधीर बुराडे (३०) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली, असा देखावा उभा करण्यात आला.

Suicide Execution by Killing Married | विवाहितेला ठार मारून आत्महत्येचा देखावा

विवाहितेला ठार मारून आत्महत्येचा देखावा

Next

पत्रपरिषद : मामा व काकाचा आरोप, प्रकरण विरली येथील
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पतीच्या जाचाला कंटाळून सारीका सुधीर बुराडे (३०) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली, असा देखावा उभा करण्यात आला. प्रत्यक्षात मात्र तीची हत्या करण्यात आल्याचा आरोप मृत विवाहित मुलीचे मामा मारोती भाऊराव येवले व काका विजय नामदेव उगे यांनी केला मंगळवारी दुपारी २ वाजता आयोजित पत्रपरिषदेत केला.
सदर प्रकरण पवनी तालुक्यातील विरली (खं) येथे २९ मार्च २०१७ रोजी घडले होते. याप्रकरणातील आरोपींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
पत्रपरिषदेत माहिती देताना येवले म्हणाले, सारीकाचा विवाह डोंगरगाव येथील सुधीर बुरांडे याच्याशी २० मे २००५ रोजी रितीरिवाजानुसार झाला होता. लहान-लहान बाबीवरून सुधीर पत्नीवर नेहमी संशय घेत होता. त्यानंतर मारझोड करीत होता. यात तिला अपमानाला सामोरे जावे लागत होते. दोन मुले असतानाही आणि शिक्षकी पेशातील या व्यक्तीने संशय घेणे बंद केले नाही.
सुधीर बुरांडे यांना दारूचे व्यसन आहे. जवळपास दोन महिन्यांपूर्वी सुधीरने सारीकाचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी गावातीेल काही लोकांनी मध्यस्थी करून प्रकरण मिटविले होते. सुधीर हा विरली खंदार येथील शाळेत शिक्षक आहे. त्यांना तृप्ती (११) व निर्भय (९) ही दोन अपत्ये आहेत. घटनेच्या दिवशी म्हणजे २९ मार्च २०१७ रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास सारीकाने आत्महत्या केल्याची माहिती फोनद्वारे देण्यात आली. सारिकाच्या दोन्ही हातांच्या नसा कापलेल्या होत्या, परंतू शरीरावर रक्ताचे डाग नव्हते, तोंड पूर्णपणे बंद होते. दोन्ही तळपाय झुलत न राहता सरळ होते. हातांच्या नसा कापण्यात आली तर पंख्याला गळफास कसा घेऊ शकतो, असे विविध प्रश्नांची उत्तरे अजुनही गुलदस्त्यात आहे. तपास अड्याळचे पोलिस निरिक्षक अजाबराव नेवारे करीत आहेत. मात्र जवळपास दोन महिन्यांचा कालावधी होत आला असतानाही मृतक सारिकाचा पती, सासू व सासरे याच्यावर अजुनपावेतो कारवाई करण्यात आलेली नाही. सारिकाची हत्या करून आत्महत्येचा देखावा निर्माण केल्याचा आरोपही मृत मुलीचे मामा मारोती भाऊराव येवले व काका विजय नामदेव उगे यांनी केला आहे.

अंत्यसंस्कारालाही मुलांना जाऊ दिले नाही
२९ मार्च २०१७ रोजी दुपारच्या सुमारास सारिकाचा मृत्यू झाला. सारीकाच्या नातेवाईकांना विरली येथे पोहचण्यास थोडा अवधी लागला. तोपर्यंत सारिकाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रूग्णालयातील शवागृहात हलविण्यात आला होता. उत्तरीय तपासणीनंतर सारिकाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार तिच्या माहेरी व्हावे, अशी इच्छा व्यक्त झाली. सारिकाचा मृतदेह माहेरी नेण्यास हरकत नाही परंतू यावेळी सारिकाच्या दोन्ही मुलांना पाठविणार नाही, अशी अमानवीय भूमिका बुरांडे परिवाराने घेतली. ३० मार्च २०१७ च्या पहाटे १ वाजताच्या सुमारास सारिकाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्या दोन जिवांना गर्भात नऊ महिने पोषण करून जन्म दिला, तीच मुले आपल्या आईच्या अंत्यविधीलाही उपस्थित राहू शकली नाही. विशेष म्हणजे बुरांडे कुटुंबियातील सदस्यही उपस्थित नव्हते, अशी माहितीही मारोती येवले व विजय उगे यांनी पत्रपरिषदेत दिली. सारीका ही साडेतीन वर्षांची असताना तिच्या आई-वडिलांचा मूत्यू झाला होता. अशा स्थितीत तिच्या आजी व मामाने पालनपोषण केले. लग्न लावून दिले. आई- वडिलांच्या प्रेमाला मुकलेल्या सारिकाला सासुरवाडीतही चटके सोसावे लागले. वा..रे..नियती.

Web Title: Suicide Execution by Killing Married

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.