प्रकाश हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:36 IST2021-07-28T04:36:35+5:302021-07-28T04:36:35+5:30

अड्याळ : इयत्ता दहावीच्या परीक्षेत अड्याळ येथील प्रकाश हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. शाळेचा निकाल शंभर टक्के ...

Success of Prakash High School students | प्रकाश हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

प्रकाश हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

अड्याळ : इयत्ता दहावीच्या परीक्षेत अड्याळ येथील प्रकाश हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून, शाळेची विद्यार्थिनी सिद्धिशा प्रशांत गिरी हिने ९८.८० टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक प्राप्त केला. शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंदांनी विद्यार्थिनीचा घरी जाऊन तिचा सत्कार केला. या शाळेची खुशी गुडवेल मेश्राम ९८.६० टक्के गुण घेऊन द्वितीय आली, तर कोणार्क किरण देशमुखने ९६.४० टक्के गुण मिळवीत तृतीय स्थान पटकाविले. याशिवाय जान्हवी मोरेश्वर बुराडे ९६ टक्के, सेजल प्रशांत तलमले याने ९५.४० टक्के गुण प्राप्त केले. या शाळेतून १०३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १४ विद्यार्थिनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहेत. ६३ विद्यार्थ्यांनी प्रावीण्य श्रेणी, तर ४० विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रकाशे, अनुराधाताई प्रकाशे, मुख्याध्यापक आर. एम. शहारे, पर्यवेक्षक एन. एस. वैद्य, शिक्षक वैरागडे, करंजेकर, गभणे, बावणे, मारवाडे, कुलरकर, देशकर, नगराळे, मुनीश्वर, मेश्राम यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.

Web Title: Success of Prakash High School students