उपजिल्हा रुग्णालयातील दोन्ही रुग्णवाहिका ‘आजारी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 22:02 IST2018-10-28T22:02:00+5:302018-10-28T22:02:22+5:30

पुर्वविदर्भात आरोग्य सुविधेसाठी नावलौकीक असलेल्या तुमसर येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील दोनही रुग्णवाहिका आता कालबाह्य झाल्यात जमा असून त्यांचीच सेवा घेतली जात असल्याने त्या सतत नादुरुस्त असतात. आता त्या दोन्ही रुग्णवाहिका नागपूर येथे दुरुस्तीसाठी पाठविल्याचे रुग्णांची हेळसांड होत आहे. सर्व भार १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकावंर आला आहे.

Sub-district Hospital Ambulance 'sick' | उपजिल्हा रुग्णालयातील दोन्ही रुग्णवाहिका ‘आजारी’

उपजिल्हा रुग्णालयातील दोन्ही रुग्णवाहिका ‘आजारी’

ठळक मुद्देतुमसरमध्ये रुग्णांची हेळसांड : दुरुस्तीसाठी नागपूरकडे रवाना

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : पुर्वविदर्भात आरोग्य सुविधेसाठी नावलौकीक असलेल्या तुमसर येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील दोनही रुग्णवाहिका आता कालबाह्य झाल्यात जमा असून त्यांचीच सेवा घेतली जात असल्याने त्या सतत नादुरुस्त असतात. आता त्या दोन्ही रुग्णवाहिका नागपूर येथे दुरुस्तीसाठी पाठविल्याचे रुग्णांची हेळसांड होत आहे. सर्व भार १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकावंर आला आहे.
तुमसर येथे सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालय आहे. याठिकाणी १०० घाटांची सोय आहे. तुमसर तालुक्यासह मध्यप्रदेशातील रुग्ण येथे मोठ्या संख्येने उपचारासाठी येतात. आरोग्य सेवा पुरविल्याबदल आतापर्यंत या उपजिल्हा रुग्णालयाला अनेक पुरस्कार मिळाले आहे. अशा या नावलौकीक प्राप्त उपजिल्हा रुग्णालयाची रुग्णवाहिका मात्र सतत आजारी असते. विशेष म्हणजे गत अनेक वर्षांपासून सेवेत आहेत. त्या सतत नादुरुस्त होतात.
पंधरा दिवसांपूर्वी दोन्ही रुग्णवाहिकेत तांत्रीक बिघाड झाल्या त्यामुळे दोन्ही रुग्णवाहिका नागपूर येथे उपचारासाठी रवाना करण्यात आल्या आहेत. सर्व भार १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेवर आहे. रुग्णवाहिका दुरुस्तीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडून रितसर परवानगी घ्यावे लागते. त्यामुळे यात बराच वेळ जावु शकतो. तोपर्यंत रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे.
रुग्णांचा आरोग्य सेवेतील रुग्णवाहिका अविभाज्य घटक आहे. रुग्णवाहिकेत वारंवार तांत्रीक बिघाड होत असल्याने रुग्णवाहिकेचे आयुष्य संपल्यातच जमा आहे. आता येथे नविन रुग्णवाहिका गरजेची झाली आहे. शासनाने अत्याधुनिक नविन रुग्णवाहिका द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक कमलाकर निखाडे यांनी केली आहे.

तुमसर उपजिल्हा रुग्णालयात दोन रुग्णवाहिका आहेत. त्या दुरुस्तीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आल्या आहेत. सध्या रुग्णांसाठी १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेच्या सेवा सुरु आहे. आवश्यक रुग्णांना तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिली जाते.
- डॉ. कल्पना म्हसकर
अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय तुमसर

Web Title: Sub-district Hospital Ambulance 'sick'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.