विद्यार्थ्यांनी वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:31 IST2021-02-15T04:31:44+5:302021-02-15T04:31:44+5:30
भंडारा : अपघाताने मनुष्याची आर्थिकहानी तर होतेच, परंतु त्याहीपेक्षा सर्वात मोठी कधीही न भरून निघणारी जीवितहानी होऊ शकते. हे ...

विद्यार्थ्यांनी वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळावेत
भंडारा : अपघाताने मनुष्याची आर्थिकहानी तर होतेच, परंतु त्याहीपेक्षा सर्वात मोठी कधीही न भरून निघणारी जीवितहानी होऊ शकते. हे टाळण्यासाठी वाहन चालकांनी, तसेच विद्यार्थी दशेपासूनच विद्यार्थ्यांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्रीधर सहारे यांनी केले. भंडारा तालुक्यातील गणेशपुर येथे मिशन हायस्कूल व भंडारा वाहतूक पोलीस नियंत्रण नियंत्रण शाखा भंडाराच्या वतीने आयोजित रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत चित्रकला व प्रबोधनात्मक कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मिशन हायस्कूलच्या प्राचार्य त्रिवेणी ख्रिस्ती, शाळेतील शिक्षिका चेटुले, वाघमारे, मोरे, जेकब, तिडके यांच्यासह वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा व वाहतूक नियम जनजागृतीसाठी प्रबोधनात्मक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी जनजागृती केली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक शहारे यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करून विद्यार्थ्यांनी वडीलधाऱ्या माणसांना, तसेच गावागावांत वाहतूक नियमांची प्रचार प्रसिद्धी करून, रस्ता सुरक्षा अभियान यशस्वी करण्यास संबंधित मदतीचे आवाहन केले. यानंतर, प्राचार्य त्रिवेणी ख्रिस्ती यांनी विद्यार्थ्यांना शाळेत येताना, तसेच शाळेतून घरी परतत असताना विद्यार्थ्यांनी काटेकोरपणे पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे वाहतूक नियमांची अंमलबजावणी करण्याची शपथ दिली. कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. संचालन चेटुले यांनी केले, तर आभार वाघमारे यांनी मानले.