संस्कारच्या विद्यार्थ्यांनी जाणला ऐतिहासिक आंबागड किल्ल्याचा इतिहास

By Admin | Updated: May 20, 2016 00:49 IST2016-05-20T00:49:33+5:302016-05-20T00:49:33+5:30

शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणे ग्रामीण विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार व्हावेत या उदात्त हेतूने ध्येय वेडे असलेल्या..

Students of Sanskrash realized the history of the historic Amagad fort | संस्कारच्या विद्यार्थ्यांनी जाणला ऐतिहासिक आंबागड किल्ल्याचा इतिहास

संस्कारच्या विद्यार्थ्यांनी जाणला ऐतिहासिक आंबागड किल्ल्याचा इतिहास

भंडारा : शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणे ग्रामीण विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार व्हावेत या उदात्त हेतूने ध्येय वेडे असलेल्या विलास केजरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागात भिलेवाडा येथील धुनीवाले बाबा मठ परिसरात १५ दिवसांचे नि:शुल्क ग्रीष्मकालीन संस्कार शिबिर घेतले. या शिबिरात अनेक शाळेतील विद्यार्थ्यांनी संस्कारचे धडे गिरविले. तसेच विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक रमणीय आंबागड किल्ल्याचा इतिहास जाणला. तारूण्यातील उत्साह, जोम, साहस व्यर्थ वाया न जाऊ देता साहसी उपक्रमाद्वारे निसर्ग, ऐतिहासिक,पर्यावरण आदिंची जवळीक साधून साक्षात रूपाने आनंद प इतिहास न्याहाळता यावा,या उद्देशाने संस्कारच्या बच्चे वंष्ठपनीने शिबिर प्रमुख विलास केजरकर, कारधा केंद्र प्रमुख प्रदिप काटेखाये यांचे मार्गदर्शनाखाली आंबागड किल्ला या ऐतिहासिक स्थळाला भेट दिली.
ग्रीनहेरिटेजचे संस्थापक मो. सईद शेख यांनी आंबागड किल्ल्याचे संपूर्ण दर्शन घडवून माहिती दिली. या दरम्यान जिल्हयाचे तापमान ४५.५ अंशावर असतांना सुध्दा शिबिरातील सर्व विद्यार्थींनी घनदाट जंगलातून वाट तुडवित,मोठया मंडळींना मागे टाकून गड सर केला. भव्य-दिव्य प्रवेश द्वार,भव्य बुरूज,नगारखाना,३ टेहळणी बुरूज,भव्य पाण्याचे टाके (बावडी),बाले किल्ला,राणीचे महाल,राणीच्या स्नानघराचे ठिकाण,तळघर, वैष्ठदखाना, चोर दरवाजा,कडेलोट, गुप्तमार्ग, परकोट ,धान्यकोठारे,सेनेचे निवासस्थानाचे अवशेष, मिनारे,चबुतरे ई. ऐतिहासिक व प्राचीन स्थळांचे दर्शन केले. आजूबाजूच्या निसर्गरम्य देखावा, उजवीकडे भव्य बघेडा व पूर्वीकडे बंदरझिरा जलाशयाचे मनोरम दृश्य, सातपुडा शाखेतील पर्वतरांगा, वनश्रीमुळे एक आगळेच आकर्षण किल्ल्याच्या सौंदर्यात भर घालणारे होते. किल्ल्याचे जतन व सौंदर्यीकरणाचे अनेक कामे पूर्ण होवून याबद्दल सर्वांनी कौतूक केलेत. किल्ल्याचे कामे अजूनही सातत्याने सुरू असून शेष कामे पूर्ण करण्याकरिता शासनातर्पे ३ कोटी रुपए आणखी येणार असल्याचे मो. सईद शेख यांनी या प्रसंगी सांगून एक चांगले पर्यटनस्थळ म्हणून आंबागड किल्ल्याचे कायापालट होणार असल्याचे म्हटले .
किल्ला भेटी दरम्यान कारधा येथील सरपंच. शितल करंडे, डॉ.विजय आयलवार, इंजि. निशांत काटेखाये (पूणे), ललितसिंह बाच्छिल, सुरेश कोटगले, अमित गि-हेपूंजे, शिबिर सहप्रमुख राहूल मंदूरकर, पिंकी मिश्रा, पुरूषोत्तम व रत्नमाला बावने तसेच जि.प.शाळा (भिलेवाडा),पोद्दार इंटरनॅशनल स्कुल (कारधा), क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले इंग्लीश स्कुल (कारधा), जनता हायस्वूल (कुर्झा), जि.प.शाळा भूगांव (वडोदा), गांधी विद्यालय पहेला, प्रकाश हायस्वूष्ठल कारधा,कस्तुरबा बांधी विद्यालय बेलगाव, नूतन कन्या विद्यालय भंडारा, महीला समाज प्राथ.शाळा भंडारा, संत शिवराम प्राथ.शाळा भंडारा, संत गजानन महााज इंग्लीश स्वूल रामटेक, ईत्यादी शाळेतील विद्यार्थ्यांनी यात सहभागी झाले होते. वाटेत गायमुख दर्शन घेवून परतले. (प्रतिनिधी)

Web Title: Students of Sanskrash realized the history of the historic Amagad fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.