विद्यार्थ्यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र मिळालेच नाही
By Admin | Updated: April 2, 2015 00:57 IST2015-04-02T00:57:43+5:302015-04-02T00:57:43+5:30
जिल्ह्यातील विज्ञान विषयाच्या एससी, एसटी, ओबीसी, एनटीच्या विद्यार्थ्यांनी सन २०१३-१४ च्या सत्रात जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर केले होते.

विद्यार्थ्यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र मिळालेच नाही
भंडारा : जिल्ह्यातील विज्ञान विषयाच्या एससी, एसटी, ओबीसी, एनटीच्या विद्यार्थ्यांनी सन २०१३-१४ च्या सत्रात जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर केले होते. मात्र सत्र संपण्याच्या वाटेवर असतानाही विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र मिळालेले नाही. सदर प्रमाणपत्र त्वरित देण्यात यावे, अशी मागणी ओबीसी सेवा संघाने केली आहे. या आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
सन २०१४ मध्ये व्यावसायिक व तंत्रज्ञान तसेच मेडिकलमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र बंधनकारक असते. मात्र जात पडताळणी प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यामुळे गरीब व होतकरू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हा विद्यार्थ्यांवर एकप्रकारचा अन्याय आहे. विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र न मिळाल्यास शासनविरूद्ध ओबीसी सेवा संघाच्या वतीने आंदोलन पुकारल्या जाईल, असा इशारा ओबीसी सेवा संघाने दिला आहे. निवेदन देताना केशव हुड, दयाराम आकरे, रामचंद्र तरोणे, निश्चय दोनाडकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)