शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

राज्यमार्ग कामासाठी कोंढा येथे शिवसेनेचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 6:00 AM

केंद्र शासनाच्या निधीतून या राज्यमार्गाचे काम होत असताना केंद्र शासनाचे लोकप्रतिनिधी राजकारण करीत नाही. लोकांना बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे. तेव्हा कंत्राटदार कामात दिरंगाई करीत असेल तर समज देऊन काम वेळेत पूर्ण करीत नसेल त्याचे नाव काळ्या यादीत घालावे, नागरिकांच्या जीवाशी व आरोग्याशी खेळू नये, असे यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर म्हणाले.

ठळक मुद्देवाहतूक ठप्प : कामाच्या संथगतीने अपघाताची वाढली भीती

लोकमत न्यूज नेटवर्ककोंढा-कोसरा : भंडारा - पवनी-निलज या राज्यामार्गाचे काम सध्या संथगतीने होत असून ठिकठिकाणी रस्ता खोदून ठेवला आहे. रस्त्यावर धूळ उडत आहे. रस्ता खोदून ठेवल्याने आतापर्यंत निरपराध लोकांना जीव गमवावा लागला आहे. या राज्यमार्गाचे काम बांधकाम कंपनीने वेगाने करावे, बांधकामात चांगल्या दर्जाचे साहित्य वापरण्यात येऊन बंद असलेले काम त्वरीत सुरु करण्यात यावे यासाठी कोंढा-कोसरा येथे भंडारा, पवनी तालुका शिवसेनेतर्फे गुरूवारी रास्तारोको आंदोलन करण्यात आले.आंदोलनाचे नेतृत्व नवनिर्वाचित आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केले. यावेळी पवनी तालुका शिवसेनाप्रमुख विजय काटेखाये, भंडारा तालुका प्रमुख अनिल गायधने, भंडारा विधानसभा प्रमुख राजु ब्राम्हणकर, माजी सरपंच शिवाजी फंदी, उपजिल्हा प्रमुख अनिल धकाते, नरेश बावनकर, प्रशांत भुते, देवराज बावनकर, सरपंच शेवंता जुगनाके, महिला शिवसेना तालुका आघाडी प्रमुख भाग्यश्री गभने, प्रकाश मानापुरे, ज्ञानदेव कुर्झेकर, युवा जिल्हा प्रमुख जितेंद्र ईखार, उपसरपंच जितेंद्र लिचडे व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.केंद्र शासनाच्या निधीतून या राज्यमार्गाचे काम होत असताना केंद्र शासनाचे लोकप्रतिनिधी राजकारण करीत नाही. लोकांना बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे. तेव्हा कंत्राटदार कामात दिरंगाई करीत असेल तर समज देऊन काम वेळेत पूर्ण करीत नसेल त्याचे नाव काळ्या यादीत घालावे, नागरिकांच्या जीवाशी व आरोग्याशी खेळू नये, असे यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर म्हणाले. बांधकाम कामावर स्थानिक कामगार, जेसीबी, ट्रॅक्टर यांचे अनेक दिवसांपासून कंत्राटदाराने पेमेंट केले नाही ते देण्यात यावेश अशी मागणीही यावेळी करण्यात आली. आंदोलनकर्त्यांच्या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार चौधरी यांनी स्विकारले. कंत्राटदाराने ५ डिसेंबरपर्यंत कामात सुधारणा करीत राज्यमार्गाचे काम वेगाने करावे. कच्चा रस्त्यावर दररोज टँकरद्वारे पाणी घालावे, या मागणीवर विचार न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही शिवसैनिकांनी यावेळी दिला. अड्याळचे पोलीस निरीक्षक सुरेश ढोबळे यांच्या नेतृत्वात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनादरम्यान कोणतीही अनुचीत घटना घडली नाही.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना