गो हत्येच्या निषेधार्थ रास्ता रोको
By Admin | Updated: July 1, 2014 01:19 IST2014-07-01T01:19:28+5:302014-07-01T01:19:28+5:30
कत्तलखान्याकडे जनावरांना घेवून जाणाऱ्या वाहनांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेने पकडल्या जात आहे. मात्र पोलिसांकडून केवळ थातूरमातूर कारवाई करून आरोपीला सोडल्या जात आहे.

गो हत्येच्या निषेधार्थ रास्ता रोको
बजरंग दलाचे आंदोलन : कार्यकर्त्यांना अटक व सुटका
भंडारा : कत्तलखान्याकडे जनावरांना घेवून जाणाऱ्या वाहनांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेने पकडल्या जात आहे. मात्र पोलिसांकडून केवळ थातूरमातूर कारवाई करून आरोपीला सोडल्या जात आहे. या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय महामार्गावर बजरंग दल व विश्वहिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. अर्धा तास वाहतूक अडवून पोलिसांच्या कारभाराचा निषेध केला.
आठवड्याभरापुर्वी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना ट्रकचा पाठलाग करून कत्तलखान्याकडे घेवून जाणारा जनावरांची सुटका केली. काल, रविवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास ट्रक पकडून २५ जनावरांची मुक्तता केली. मागील काही वर्षांपासून कसायांची टोळी सक्रीय झाली असताना पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे.
बजरंगदलाच्या कार्यकर्त्यांनी आरोपींना पकडून दिल्यानंतरही पोलिसांकडून कारवाई केली जात नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. त्यावर निर्बंध घालण्यासाठी विश्वहिंदू परिषदेचे डॉ.संजय एकापुरे यांच्या नेतृत्वात महामार्ग वाहतूक अडवून गो हत्या थांबविण्याची मागणी लावून धरली. यात आ.नरेंद्र भोंडेकर सहभागी होवून आंदोलनास समर्थ दिले. त्यांच्यासोबत बजरंग दल व विश्वहिंदू परिषदेचे कार्यकर्त्यांनी महामार्ग अडविल्याने काहीवेळ तणानाची परिस्थिती निर्माण झाली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन गोरे यांनी मागण्यांसदर्भात विचार करण्याचे आश्वासन दिले. यानंतर आंदोलनकर्त्यांना अटक करण्यात आली. आंदोलनात डॉ.पलास शांडिल्य, भाजपचे शहर अध्यक्ष विकास मदनकर, संजय मते, आशिष मोहदी, राहूल ढोंमणे, मनिष बिचवे आदीत्य ठाकरे, शिव भंडारी, मनिष तिरपुडे, बंटी बांते, मनिष मिश्रा आदी सहभागी झाले होते. (नगर प्रतिनिधी)