मालमत्ताधारकांकडून सक्तीची वसुली थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:38 IST2021-09-25T04:38:55+5:302021-09-25T04:38:55+5:30
कोरोनाकाळात अनेकांच्या हाताला काम नाही. त्यातच कोरोनामुळे अनेक नागरिकांचा मृत्यू ओढवल्याने आम जनतेच्या कुटुंबीयांवर दुःखाचे सावट उभे असल्याने गोरगरीब ...

मालमत्ताधारकांकडून सक्तीची वसुली थांबवा
कोरोनाकाळात अनेकांच्या हाताला काम नाही. त्यातच कोरोनामुळे अनेक नागरिकांचा मृत्यू ओढवल्याने आम जनतेच्या कुटुंबीयांवर दुःखाचे सावट उभे असल्याने गोरगरीब जनतेला दिलासा मिळावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणतेही कर जबरदस्तीने वसूल करण्यात येऊ नये, असे स्पष्ट आदेश दिले आहे. मात्र, असे असतानादेखील त्या आदेशाची अवहेलना करीत तुमसरनगर परिषदेने गतवर्षी थकीत झालेल्या मालमत्ताधारकांना कोर्टातून नोटीस बजावून तत्काळ पैसे भरण्यास सांगितले आहे. अन्यथा, त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याने मालमत्ताधारक घाबरलेले असून मानसिक तणावात जीवन जगत आहेत. भविष्यात त्यांच्या जीवितासही धोका निर्माण झाला असल्याने पुढे होणाऱ्या कोणत्याही अनुचित प्रकाराला टाळण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने तत्काळ सक्तीने करवसुली थांबवावी, अन्यथा तुमसर तालुका व शहर काँग्रेस कमिटीतर्फे आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव प्रमोद तीतीरमारे यांनी दिला आहे.