नादुरूस्त प्रकल्पासाठी भाजपचा रास्ता रोको
By Admin | Updated: June 28, 2014 23:24 IST2014-06-28T23:24:35+5:302014-06-28T23:24:35+5:30
बावनथडी नदीवर साकारण्यात आलेला सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प पावसाळा तोंडावर असतानाही नादुरूस्त आहे. निधी अभावी प्रकल्प भंगारात जात असल्याच्या कारणावरून भाजपच्या वतीने

नादुरूस्त प्रकल्पासाठी भाजपचा रास्ता रोको
समस्या पाण्याची : अधिकाऱ्यांचे आश्वासन
चुल्हाड (सिहोरा) : बावनथडी नदीवर साकारण्यात आलेला सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प पावसाळा तोंडावर असतानाही नादुरूस्त आहे. निधी अभावी प्रकल्प भंगारात जात असल्याच्या कारणावरून भाजपच्या वतीने माजी खासदार शिशुपाल पटले यांच्या नेतृत्वात सिहोरा येथे तुमसर बपेरा राज्य मार्गावर शनिवारला तीन तास रास्ता रोको करण्यात आले.
सिहोरा परिसरात १४ हजार हेक्टर आर शेती सिंचित करण्यासाठी बावनथडी नदीवर सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प साकारण्यात आलेला आहे. या प्रकल्पावर ११० कोटी रूपये खर्च करण्यात आले असून खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पाणी वाटप करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्प अंतर्गत नदीतील पाण्याचा उपसा करून चांदपुर जलाशयात पाण्याची साठवणुक करण्यात येत आहे. परंतु यंदा या प्रकल्पात निधीअभावी संकट निर्माण झाले आहे. पंपगृहांना विज पुरवठा करणाऱ्या बॅटऱ्या तथा विज उपकरण नादुरूस्त असल्याने पाण्याचा उपसा करण्यासाठी वर्षभरापासून प्रयत्न केले नाही. यंदा पावसाअभावी दुष्काळाचे चित्र असताना प्रकल्प दुरूस्ती करिता शासन गंभीर नाही.
यंत्रणा निधी नसल्याचे कारण पुढे करीत असल्याने यंदा पाण्याचा उपसा होणार नाही, असे चित्र निर्माण झाले. प्रकल्पातील समस्या निकाली काढण्यासाठी सिहोरा येथे पटले यांच्या नेतृत्वात जि.प. उपाध्यक्ष रमेश पारधी, कलाम शेख, हिरालाल नागपुरे, बंटी बानेवार, अशोक पटले, राजेश पटले, अंबादास कानतोडे, अजय खंगार, कुंदा वैद्य, मयुरध्वज गौतम यांच्या उपस्थितीत रास्ता रोको करण्यात आला. प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यासतवार, नायब तहसीलदार सुर्यवंशी, उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद भोईटे यांनी आंदोलकांचे म्हणने जाणून घेतले. कार्यकारी अभियंत्यांनी आंदोलन कर्त्यांना दोन दिवसात प्रकल्पातील समस्या निकाली त्यांनी काढण्याचे आश्वासन दिले. यानंतर हे रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात मनोहर सिंगनजुडे, सतीष पटले, शिवा नागपुरे, आशिष कुकडे यांनी सहभाग घेतला. रास्ता रोको आंदोलनाचे संचालन गजानन निनावे यांनी केले. या नागरिकावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकरवी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. सायंकाळी ५ वाजता वाहतूक सुरू करण्यात आली. (वार्ताहर)