आरोग्याबाबत जनजागृतीसाठी राज्यभर पदयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:37 IST2021-03-27T04:37:01+5:302021-03-27T04:37:01+5:30

१७ ऑक्टोबरला रायगड किल्ल्यावरून पदयात्रेसाठी निघालेले घनश्याम केळकर १२७ व्या दिवशी रायगड, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, ...

Statewide walk for health awareness | आरोग्याबाबत जनजागृतीसाठी राज्यभर पदयात्रा

आरोग्याबाबत जनजागृतीसाठी राज्यभर पदयात्रा

१७ ऑक्टोबरला रायगड किल्ल्यावरून पदयात्रेसाठी निघालेले घनश्याम केळकर १२७ व्या दिवशी रायगड, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा या जिल्ह्यांतून १४०० किमीपेक्षा जास्त पायी प्रवास करत माडगीमार्गे मंगळवारी भंडारा येथे पोहोचले आहेत. या महापरिक्रमेत एकूण चार हजार किलोमीटर अंतर चालत शिवनेरी किल्ल्यावर ऑक्टोबर २१ पर्यंत यात्रेचा समारोप करण्यात येणार आहेत. घरातील आजारपणामुळे ज्या कुटुंबांवर मोठे आर्थिक, मानसिक संकट कोसळते. याच काळात त्यांना मदतीचा हात देण्याची व्यवस्था प्रत्येक गाव, तालुका, जिल्ह्यात उभी करणे हा या परिक्रमेचा उद्देश आहे. यासाठी वेबसाईटच्या माध्यमातून यंत्रणा उभी करण्यात येत आहे. यात गरजूंना मदत करण्याची इच्छा असणारे, मदत पोहोचवून देण्यास पुढाकार घेणारे स्वयंसेवक, स्वयंसेवी संस्था, आरोग्य सेवा देणाऱ्या संस्थांची नोंदणी करण्यात येत आहे.

भंडारा येथे आरोग्यदान उपक्रम सुरू करण्यासाठी मदत करणाऱ्यांचे सहकार्य करणाऱ्यांची भेट घेतली. घनश्याम केळकर २५ मार्चला पुढील प्रवासाला रवाना झाले. हा उपक्रम आपल्या गावात, जिल्ह्यात, तालुक्यात सुरू करण्यासाठी उत्साही, सामाजिक कामाची आवड असणाऱ्या लोकांची गरज आहे.

Web Title: Statewide walk for health awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.