नदीपात्रातील दगड प्रकरणात तहसीलदारांनी घेतले बयान

By Admin | Updated: October 12, 2014 23:30 IST2014-10-12T23:30:18+5:302014-10-12T23:30:18+5:30

सुकळी (देव्हाडी) नदीघाट ते सुकळी गावापर्यंत अडीच कि़मी. रस्ता खडीकरणाच्या कामाकरिता वैनगंगा नदीपात्रातील दगडांची उचल करून रस्त्याशेजारी दगडांचे ढीग पाडले आहेत. याप्रकरणात नायब

The statement made by the Tahsildar in the river bed case | नदीपात्रातील दगड प्रकरणात तहसीलदारांनी घेतले बयान

नदीपात्रातील दगड प्रकरणात तहसीलदारांनी घेतले बयान

सुकळी येथील प्रकार : खनिकर्म, पंचायत समिती कार्यालय गप्प
तुमसर : सुकळी (देव्हाडी) नदीघाट ते सुकळी गावापर्यंत अडीच कि़मी. रस्ता खडीकरणाच्या कामाकरिता वैनगंगा नदीपात्रातील दगडांची उचल करून रस्त्याशेजारी दगडांचे ढीग पाडले आहेत. याप्रकरणात नायब तहसीलदारांसमक्ष तक्रारकर्ते व ग्रामपंचयत पदाधिकाऱ्यांचे बयान नोंदविण्यात आले, खनिकर्म विभाग तथा पंचायत समिती कार्यालयाने अजूनपर्यंत याची दखल घेतली नाही.
सुकळी देव्हाडी येथे जनसुविधा योजने अंतर्गत जिल्हा परिषदेने सात लाख रूपये मंजूर केले होते. येथे कामे करणारी एजन्सी ग्रामपंचायत आहे. तसा करारनामा सुकळी ग्रामपंचायतीने सार्वजनिक बांधकाम विभागाशी केला आहे. पूरहानी अंतर्गत हा रस्ता तयार करण्याची मंजूरी प्रदान करण्यात आली. येथे प्रत्यक्षात रस्ता बांधकामाला वर्कआॅर्डर मिळाले नाही. तरी प्रत्यक्षात ग्रामपंचायतीने रस्ता कामाला सुरूवात केली, अशी माहिती आहे. गावापासून अडीच कि़मी. अंतरावर वैनगंगा नदी वाहते. या नदीपात्रातून दगड गोळा करून ट्रॅक्टरने ते प्रस्तावित रस्त्याच्या कडेला ढीग पाडले आहेत.
ग्रामपंचायत सदस्य विकास ठवकर, रवि सार्वे, अनिल बुधे, गीता चौधरी, नलु चौधरीसह ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, जिल्हा खनिकर्म अधिकारी, तहसीलदार यांचेकडे तक्रार केली होती. त्यानंतर मंडळ अधिकारी क्षिरसागर यांनी या दगडांचा पंचनामा केला. १११ ट्रॅक्टर दगडसाठा प्रस्तावित रस्त्याच्या कडेला आढळला. तसा अहवाल मंडळ अधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिला.
त्यानंतरसुद्धा कारवाई थंडबस्स्त्यात होती. पुन्हा ग्रामपंचायत सदस्य नायब तहसीलदार अरविंद हिंंगे यांना कारवाई संदर्भात भेटले. नायब तहसीलदारांनी तक्रारकर्ते व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना नोटीस पाठविल्या. नायब तहसीलदार अरविंद हिंगे यांच्या दालनात तक्रारकर्ते विकास ठवकर, रवि सार्वे, ईश्वर चौधरी, सुरेश चौधरी, मोहपत मुळे यांचे तसेच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे बयान नोंदविण्यात आले. यासर्व कारवाईत जिल्हा खनिकर्म अधिकारी व खंडविकास अधिकाऱ्यांनी मौन पाळल्याचे दिसून येते.
तहसीलदारांनी दगड सध्या जप्त केले आहेत. वैनगंगा नदीपात्रातून सऱ्हास दगड गोळा करून ट्रॅक्टरने दगड राजरोसपणे प्रस्तावित रस्ता कामावर टाकण्यात आले. नदीपात्रात ट्रॅक्टरने यंत्राच्या मदतीने खरडणे करून दगड उकरून काढण्यात आले, अशी माहिती आहे. ४० व ८० एमएम दगडांचा येथे समावेश आहे. रस्त्याशेजारी ढीग तयार केला जात असतानी स्थानिक तलाठी व इतर कर्मचारी मूग गिळून गप्प कसे होते. तुमसर मुख्यालयापासून अवघ्या आठ कि़मी. अंतरावर सुकळी हे गाव आहे, हे विशेष.
काय आहे नियम
नदीच्या नैसर्गिक नदीपात्रातून एक दगड सुद्धा उचलून नेता येत नाही. सुकळी येथील वैनगंगा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात दगड आहेत. दगडांमुळे पाण्याचा प्रवाह कमी होतो. पाण्याला दिशा दगडामुळे प्राप्त होते. नदीकाठच्या जमिनीचे भूस्खलन दगडामुळे होत नाही. यामुळे केंद्र शासनाच्या पर्यावरण मंत्रालयाने फायदा केला आहे.
रेतीची उचल करताना दगडांची उचल करू नये, असे बंधन आहे. सुकळी ग्रामपंचायतीने नैसर्गिक साधनसंपत्तीची चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून मोठ्या शिक्षेची तरतुद आहे. यामुळे राजकीय दबावाखाली शासनाने येथे चौकशी व कारवाई टाळल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केली आहे. संबंधितावर कारवाई न झाल्यास न्यायालयातून दाद मागणार असल्याचे तक्रारकर्त्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The statement made by the Tahsildar in the river bed case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.