वूशू स्पर्धेत राज्यस्तरीय यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 21:32 IST2018-10-24T21:32:16+5:302018-10-24T21:32:31+5:30
औरंगाबाद जिल्ह्यातील वेरूय येथे झालेल्या राज्यस्तरीय वूशू स्पर्धेत जिल्ह्यातील सहा खेळाडूंनी पद प्राप्त करीत जिल्ह्याचे नाव उंचावले.

वूशू स्पर्धेत राज्यस्तरीय यश
ठळक मुद्देभंडाराला सहा पदके : वेरुळ येथील स्पर्धेत जिल्ह्यातील २३ खेळाडू
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : औरंगाबाद जिल्ह्यातील वेरूय येथे झालेल्या राज्यस्तरीय वूशू स्पर्धेत जिल्ह्यातील सहा खेळाडूंनी पद प्राप्त करीत जिल्ह्याचे नाव उंचावले.
या स्पर्धेत निकुंज तपट (सुवर्ण), सानिका आंबीलढुके (रौप्य), तेजस राठोड (कांस्य), शौर्य बागडे (कांस्य) तर ज्युनियर गटात अविनाश शेंडे (रौप्य) आणि पराग चिंतनवार (रौप्य) यांनी पदक पटकाविले.