शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

राज्य व केंद्र शासनाच्या घोषणा फसव्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 1:04 AM

देश पातळीवर विकासाच्या नावावर विविध फसव्या घोषणांची भरमार सुरु आहे. लोकसभा व राज्यसभेत प्रस्ताव मांडून, पास करुन सामान्य जनतेला भूलथापा देण्याचे कार्य राज्य व केंद्र शासन सातत्याने करीत असल्याचा आरोप खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : भंडारा तालुका-शहर राष्टÑवादी काँग्रेस पार्टी बुथ कमिटी कार्यकर्ता मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : देश पातळीवर विकासाच्या नावावर विविध फसव्या घोषणांची भरमार सुरु आहे. लोकसभा व राज्यसभेत प्रस्ताव मांडून, पास करुन सामान्य जनतेला भूलथापा देण्याचे कार्य राज्य व केंद्र शासन सातत्याने करीत असल्याचा आरोप खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले. भंडारा तालुका-शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बुथ कमिटी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यास मार्गदर्शन करताना खा. पटेल बोलत होते.भंडारा तालुका निहाय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बुथ कमिटी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन गुरूवारी करण्यात आले होते. मेळाव्याचे उद्घाटन खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षनी खासदार मधुकर कुकडे तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार राजेंद्र जैन, माजी राकाँचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुध्दे, प्रदेश महासचिव धनंजय दलाल, मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, माजी आ. अनिल बावनकर, कैलाश नशीने, धनेंद्र तुरकर, रेखा ठाकरे, नरेंद्र झंझाड, नितीन तुमाने, सुमेध शामकुंवर, महेंद्र गडकरी, संजय केवट, कल्याणी भुरे आदी मंचावर उपस्थित होते.खा. पटेल म्हणाले की, बाबासाहेबांच्या विचाराला मानणारे आम्हीच असे सांगून केवळ भाजपाला मदत करण्यासाठी नविन संघटना अस्तित्वात येत आहे. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना केवळ हरविण्यासाठी पैसे घेवून या संघटना समोर येत आहे. सुवर्ण समाजाला आरक्षणाच्या नावावर १० टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. ज्यांच्या मासिक पगार सत्तर हजार व पाच हेक्टर जमीन आहेत, ते मगासलेले नाही, पण गरीबांना खरचं या आरक्षणाचा फायदा होईल का? असा प्रश्न उपस्थित होतो. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी, सरकारचे काहीच काम नसतांना आपण मागे का पडत आहोत, याचा प्रामाणिक विचार करुन पुढील निवडणुकीसाठी जय्यत तयारीत असावे, अशा कानपिचक्या घेतल्या.याप्रसंगी भंडारा तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद क्षेत्रातील गावनिहाय बुथ कमिटीच्या सदस्यांच्या ओळख परेड घेऊन त्या गावातील पक्षनिहाय माहिती बुथ सदस्याकडून घेण्यात आली. तसेच गावातील समस्या जाणून घेतल्या व प्रत्यक्ष ओळख घेऊन उत्कृष्ट कार्यकर्त्यांचे कौतुकही केले. यावेळी सरिता मदनकर, प्रा. नारायणसिंग राजपूत, स्वप्नील नशीने, राजकुमार माटे, देवचंद ठाकरे, अशपाक पटले, हर्षा कराडे, मंजुषा बुरडे, रत्नमाला वैध, माधुरी देशकर, अ‍ॅड. नेहा शेंडे, स्वाती खवास, उत्तम कळपाते, गिता माटे, सुनिल शहारे, अनिल सुखदेवे, बबन मेश्राम, प्रभु फेंडर, हितेश सेलोकर, निलीमा गाढवे, रामरतन वैरागडे, आरजु मेश्राम, सुभाष तितिरमारे, जिल्हा परिषद सदस्य, नगर परिषद पंचायत समिती सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामीण महिला कार्यकर्त्या मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसprafull patelप्रफुल्ल पटेल