दुर्गाडोह कुंभली येथे आजपासून यात्रेला प्रारंभ

By Admin | Updated: January 14, 2016 00:51 IST2016-01-14T00:51:42+5:302016-01-14T00:51:42+5:30

कुंभली येथील दुर्गाबाई डोहावर आजपासून यात्रेला प्रारंभ होत असून प्रशासनाची पूर्व तयारी झालेली आहे.

Starting from today in Durgadoh Kumbhali | दुर्गाडोह कुंभली येथे आजपासून यात्रेला प्रारंभ

दुर्गाडोह कुंभली येथे आजपासून यात्रेला प्रारंभ

पोलीस प्रशासन सज्ज, लाखोंची उलाढाल होणार
कुंभली : कुंभली येथील दुर्गाबाई डोहावर आजपासून यात्रेला प्रारंभ होत असून प्रशासनाची पूर्व तयारी झालेली आहे. या यात्रेत अनेक श्रद्धावान, भाविक दुर्गादेवीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या भक्तिभावाने येतात. यात भंडारा, गोंदिया, नागपूर, गडचिरोली, वर्धा अशा अनेक जिल्ह्यातील भाविक येत असतात. श्रद्धेने स्रान करतात गावात पाहुण्यांची रेलचेल असते.
यात्रेत अनेक प्रकारची दुकाने थाटली असून लाखो रूपयांची उलाढाल होते. स्थानिक बेरोजगारांच्या हाताला काम मिळते. ही यात्रा चार ते पाच दिवस चालते. हॉटेल्स, कपड्यांची दुकाने, चपलांची दुकाने, सौंदर्य प्रसाधने, खेळणे, झुले, लोखंडी अवजारे, प्रदर्शनी तसेच विशेष आकर्षण असलेले मौत का कुआ या सर्व प्रकारामुळे यात्रा फुलून जाते. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासन सुसज्ज आहे. सामाजिक ऐक्य, समरसता, निसर्गाची मुक्त उधळण या यात्रेतून बघावयास मिळते. या यात्रेसाठी प्रसिद्ध असलेला घोडा बाजार मात्र पहावयास मिळत नाही. (वार्ताहर)

Web Title: Starting from today in Durgadoh Kumbhali