महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांचे अर्ज घेण्यास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:39 IST2021-08-25T04:39:51+5:302021-08-25T04:39:51+5:30
यासाठी १० हेक्टर क्षेत्र असणाऱ्या शेतकरी गटांनी नोंदणी करावी. नोंदणीसाठी ३० ऑगस्ट ते १० सप्टेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात ...

महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांचे अर्ज घेण्यास सुरुवात
यासाठी १० हेक्टर क्षेत्र असणाऱ्या शेतकरी गटांनी नोंदणी करावी. नोंदणीसाठी ३० ऑगस्ट ते १० सप्टेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ
देण्यात येत आहे. ऑनलाइन अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांचाच प्राधान्याने विचार करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अंतर्गत कडधान्य पिकातील हरभरा पिकासाठी राज्यातील सर्व जिल्हे समाविष्ट आहेत.
बियाणे वितरणात हरभरा बियाणांसाठी दहा वर्षांच्या आतिल वाणास २५ रुपये प्रतिकिलो तर दहा वर्षांवरील वाणास १२ रुपये प्रतिकिलो अनुदान मिळणार आहे. प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला दोन हेक्टरपर्यंतच लाभ दिला जाणार आहे. बियाणे, जैविक खते, सूक्ष्म मूलद्रव्य, पीक संरक्षण औषधे या निविष्ठांसाठी पीक प्रात्यक्षिकांसाठी एका शेतकऱ्याला एक एकर मर्यादित निविष्ठा स्वरूपात अनुदान उपलब्ध होणार आहे. या निविष्ठांसाठी शेतकऱ्याला एक एकराच्या मर्यादित पिकासाठी संबंधित पिकाच्या प्रकारानुसार दोन हजार ते चार हजार रुपये प्रतिएकर मर्यादेत २००० हजार ते ४००० हजार रुपये प्रतिएकर मर्यादेत डीबीटी तत्त्वावर अनुदान दिले जाणार आहे. यासाठी कृषिशास्त्रज्ञांच्या सल्ल्याने जिल्हानिहाय पॅकेज तयार करण्यात येत असून, संपूर्ण पॅकेजचा वापर करणे अनिवार्य आहे.
कोट
महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची निवड ही ऑनलाइन लॉटरी पद्धतीने होणार असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनात महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावे. अधिक माहितीसाठी आपल्या गावच्या कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षकांशी संपर्क साधावा.
हिंदूराव चव्हाण,
जिल्हा कृषी अधीक्षक, भंडारा