किटाडी जंगलात पेटला वणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 22:56 IST2019-04-01T22:55:56+5:302019-04-01T22:56:14+5:30

लाखनी तालुक्याच्या किटाडी जंगलात वणवा पेटल्याने वनसंपदा धोक्यात आली आहे. ही आग वणवा आहे की लावण्यात आली, असा संशय आता निर्माण होत आहे.

Stacked kittadi jungle | किटाडी जंगलात पेटला वणवा

किटाडी जंगलात पेटला वणवा

ठळक मुद्देवनसंपदा धोक्यात : वणवा पेटला की आग लावली?

लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : लाखनी तालुक्याच्या किटाडी जंगलात वणवा पेटल्याने वनसंपदा धोक्यात आली आहे. ही आग वणवा आहे की लावण्यात आली, असा संशय आता निर्माण होत आहे.
किटाडी-मांगली रस्त्यावर बालाजी किल्ला परिसरात रविवारी वणवा लागल्याचे दिसून आले. या वणवामुळे वनसंपदेचे मोठे नुकसान होत आहे. पशुपक्षीही सैरभैर झाले आहे. वन्यप्राण्यांचे नैसर्गिक निवास धोक्यात आले आहे.
किटाडी वनपरिक्षेत्र राखीव क्षेत्र व खुले असे दोन भाग असून दोन्ही भागाचे अधिकार क्षेत्र वेगवेगळे आहेत. आग आटोक्यात आण्यासाठी कार्यक्षेत्राचा विचार करुन कारवाई केली जाते. अशातच वेळ होऊन वनसंपदा धोक्यात येत आहे.
या जंगलात वाघ, बिबट, अस्वल, हरिण, मोर, चितळ, सांबर आदी प्राणी आहेत. आता जंगलात सर्वत्र धुर झाला असून यामुळे वन्यप्राणी सैरभैर झाले आहे. वनविभागाने या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजनेची गरज निर्माण झाली आहे.

Web Title: Stacked kittadi jungle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.