शहरं
Join us  
Trending Stories
1
"जरांगेंना दिलेल्या कागदाचा टाचणी एवढाही उपयोग नाही"; मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटलांचे स्पष्ट मत
2
गुलाल, आतषबाजी आणि घोषणांच्या गजरात मनोज जरांगे मध्यरात्री संभाजीनगरात; रुग्णालयात दाखल, आरामाचा सल्ला
3
आजचे राशीभविष्य, ०३ सप्टेंबर २०२५: आज नवीन काम सुरू करू नका, स्वकीयांचे गैरसमज होतील
4
आंदोलकांच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांनी मागितली कोर्टाची माफी, आणखी काय-काय घडलं?
5
रशियाचे तेल झाले आणखी स्वस्त! अमेरिकन टॅरिफमुळे भारतासाठी संकटासोबत आली संधीही
6
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल
7
"सिनेमातील माझे बोल्ड सीन्स आईवडिलांना पाठवतात...", अभिनेत्रीने ट्रोलर्सवर व्यक्त केला संताप
8
टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी अर्ज करा! BCCIने मागविल्या बोली; अंतिम तारीखही दिली
9
समसप्तक चतुर्ग्रही ग्रहण योग: ८ राशींना लॉटरी, पद-पैसा-प्रतिष्ठा; अकल्पनीय लाभ-नफा-फायदा!
10
सोन्यातून वर्षभरात ३४% तर चांदीतून ४०% परतावा; गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून विचार
11
कळा वाढल्याने भररस्त्यात रुग्णवाहिकेतच केली प्रसूती; डॉक्टरांच्या निर्णयामुळे मायलेक सुखरूप
12
इलेक्ट्रॉनिक्ससह रोजच्या वापरातील वस्तू होणार स्वस्त, EVवर टॅक्स; GST परिषदेची आजपासून बैठक
13
मोठी झेप! भारताने बनविली स्वदेशी ‘विक्रम’ चिप! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण
14
माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना बिहारची जनता माफ करणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
15
एलिफंटा, न्हावा बेटावर पर्यटनासाठी मास्टर प्लॅनिंग; सिडको करणार विकास; ग्रामस्थ संभ्रमात
16
दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल
17
अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रात्री ६ रिक्टर स्केल क्षमतेचा तीव्र भूकंप; ८०० लोकांचा मृत्यू
18
मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक
19
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
20
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?

एसटीला अवैध वाहतुकीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 00:52 IST

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य असलेल्या एसटी विभागाला सध्या अवैध वाहतुकीचा सामना करावा लागत असून खासगी वाहनचालक बस वेळेवर येत नसल्याच्या संधीचा फायदा उठवत बसस्थानकातून प्रवासी पळवत आहेत. याचा फटका एसटी विभागाला बसत असून यावर पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे .

ठळक मुद्देमहसूल बुडतोय : कारवाई मात्र शून्य, जिल्ह्यात अवैध वाहतुकीला उधाण

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य असलेल्या एसटी विभागाला सध्या अवैध वाहतुकीचा सामना करावा लागत असून खासगी वाहनचालक बस वेळेवर येत नसल्याच्या संधीचा फायदा उठवत बसस्थानकातून प्रवासी पळवत आहेत. याचा फटका एसटी विभागाला बसत असून यावर पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे .परिवहन विभागाकडून विद्यार्थांसह, वृद्धांसाठी अनेक प्रकारच्या चांगल्या योजना राबवल्या जात असल्या तरी प्रवासी वाढीसाठी मात्र एस टी विभागाला कसरत करावी लागत आहे भंडारा जिल्हयात एस टी ची चार आगारे आहेत. अनेक विभागातील ग्रामीण बसफेऱ्या अनियमित होत असल्याने नाइलाजास्तव प्रवासी खाजगी वाहतुकीकडे वळत आहे त्याचाच परिणाम एस टी ला लाखो रूपयांचा फटका सहन करावा लागत आहे. एस टी विभागाकडून अनेक जाहीरीतींद्वारे प्रवाशांना जागृत करण्याचे काम सुरु असले तरी अधिकाऱ्यांचे हे प्रयत्न तोकडे पडत आहेत यासाठी नागरिकांनी स्वत दक्षता घ्यावी.तालुकास्तरापासून ते जिल्हास्तरापर्यत जवळपास सर्वच ठिकाणी काळीपिवळी, तीन ते चारचाकी आॅटो यासारख्या वाहनांतून ही अवैध वाहतूक सुरु आहे. राष्ट्रीय महामार्गावरील लाखनी, जवाहरनगर, साकोली यासारख्या प्रमुख महामार्गावर अवैध वाहतुक नित्याचीच बनली असून अनेक प्रवाशांना यापुर्वीही नाहक जीव गमवावा लागला आहे.महाशिवरात्रीनिमित्त सर्वत्र तिर्थस्थळावर यात्रा भरत असते. या महाशिवारात्रीच्या पर्वावर सर्वच बसस्थानक परिसरात भाविकांची गर्दी वाढत असल्याने खाजगी वाहनचालक प्रवाश्यांचा जीव धोक्यात घालून क्षमतेक्षा अधिक प्रवासी बसवून वाहतूक करत आहेत बरेच प्रवासी तर दाराजवळ लोंबकळत असतात बºयाचदा तर चालकांच्या अरेरावीपणामुळे प्रवाशांना मध्येच रस्त्यात उतरवण्याचे प्रकार घडले आहेत.दाटीवाटीने बसलेल्या प्रवाशांमुळे चालकाला नीट गाडीसुध्दा चालविता येत नाही. त्यामुळे क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरुन वाहतूक होत आहे. भरधाव प्रवाशी वाहतुकीमुळे मोठ्या दुर्घटना होण्याचा धोका वाढत आहे.अवैध वाहतुकीला पोलिसांनी वचक बसविण्याची गरज निर्माण झाली आहे, अशी मागणी जनसामान्यातून होत आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक