एस.टी. महामंडळाचा प्रवाशांना फटका
By Admin | Updated: May 20, 2016 00:47 IST2016-05-20T00:47:34+5:302016-05-20T00:47:34+5:30
राज्य महामार्ग परिवहन मंडळाद्वारे नव्याने तिकीट काढणारी यंत्रणा बसच्या वाहकाकडे देण्यात आले.

एस.टी. महामंडळाचा प्रवाशांना फटका
कारवाईची मागणी : नाहक भुर्दंड
जवाहरनगर : राज्य महामार्ग परिवहन मंडळाद्वारे नव्याने तिकीट काढणारी यंत्रणा बसच्या वाहकाकडे देण्यात आले. मात्र त्यामध्ये वैध असलेली त्रैमासिक पास अवैध असल्याचे दाखवित असल्याने पासधारकांना तिकीट काढून प्रवास करावा लागत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
राज्य परिवहन महामंडळाने प्रवासीसाठी विविध सवलतीच्या योजना आखल्या. यात शालेय मासिक पास, सिझन पास, नोकरीवरील कर्मचाऱ्यांसाठी १० टक्के वाली त्रमासिक पास व इतर यांचा समावेश आहे. महामंडळाकडून नवनवीन यंत्रणा कार्यान्वित करून बस वाहकांना तिकीट काढण्याचे यंत्र पुरविण्यात येते. मात्र त्या यंत्रणामध्ये वैध असलेली मासीक त्रैमासिक पासेसचा क्रमांक टाकल्यास विसर पडत आहे. असाच प्रकार दिनांक १८ मे २०१६ रोजी उघडकीस आला. खरबी (नाका) येथील रहिवासी निखील बावनकर हा नागपूरला आपल्या कर्तव्यावर सकाळी ७.४७ दरम्यान जाण्यासाठी ठाणा पेट्रोलपंप येथून तुमसर आगाराची बसने निघाला.
तुमसर - नागपूर बस मधील वाहकाला त्रैमासिक पास क्रमांक पी - ०००१२०७१९ कार्ड दाखविला. दरम्यान तिकीट काढणाऱ्या यंत्रणाने सदर क्रमांकाचे कार्ड अवैध असल्याचे निखीलला सांगितले. बाचाबाची अंती निखिलला ५८ रु. ची तिकीट काढून प्रवास करावा लागला. त्याने काढलेली त्रैमासिकची मुदत १ मार्च ते २९ मे २०१६ दरम्यानची असल्याने रोज तिकीट ने जावे लागेल काय असा प्रश्न निखील बावणकर पुढे आला. आपल्या न्यायासाठी भंडारा आगाराकडे तक्रार नोंदविण्याचे पर्याय असल्याचे सांगितले. या गंभीर बाबीकडे, संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. (वार्ताहर)