स्पर्धा व प्रशिक्षणात सखींचा उत्स्फूर्त सहभाग
By Admin | Updated: May 3, 2015 00:43 IST2015-05-03T00:43:51+5:302015-05-03T00:43:51+5:30
लोकमत सखी मंचतर्फे पवनी येथील लक्ष्मी रमा सभागृहात विचित्र वेशभूषा व विविध स्पर्धेचे आयोजन केले गेले होते.

स्पर्धा व प्रशिक्षणात सखींचा उत्स्फूर्त सहभाग
सखी मंचचा उपक्रम : पवनीत वेशभूषा स्पर्धा
पवनी : लोकमत सखी मंचतर्फे पवनी येथील लक्ष्मी रमा सभागृहात विचित्र वेशभूषा व विविध स्पर्धेचे आयोजन केले गेले होते. त्यात तालुकाभरातून सखी युवती व महिलांनी उत्फूर्त प्रतिसाद नोंदविला.
स्पर्धेचे परीक्षण मीना जिभकाटे व सुप्रिया रेहपाडे यांनी केले. विचित्र वेशभूषा स्पर्धेत प्रथम क्रमांक जया नागुलवार, द्वितीय माधुरी हर्डे तर तृतीय क्रमांक छाया जनबंधू यांनी पटकाविला. पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना गिफ्ट वाटप करण्यात आले. संचालन माधुरी हर्डे यांनी तर आभारप्रदर्शन तालुका संयोजिका अल्का भागवत यांनी केले. वैशाली शोभने हर्डे काटेखाये, दुर्गा पिपरे, सुनिधी भागवत, धारगावे व गजभिये यांनी सहकार्य केले.
साकोलीत सौंदर्य प्रशिक्षण
लोकमत सखी मंचतर्फे साकोली येथे दि. ४ व ५ मे रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत लोटस ब्युटी पार्लर, शारदा चौक पंचशील वॉर्ड येथे दोन दिवसीय ब्युटीपार्लर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील सखी युवती व महिला प्रशिक्षणात नि:शुल्क सहभागी होतील. सौंदर्यतज्ज्ञ ज्योत्स्ना रंगारी सखींना प्रात्यक्षिक प्रशिक्षण व घरगुती महत्वाच्या टिप्सदेखील देतील. सखींनी सोबत वही व पेन आणणे अनिवार्य आहे. अधिक माहितीकरिता तालुका विभाग प्रतिनिधी सुचिता आगाशे (८३९०७२७७१८) व (९६३७७३४६२६) यांच्याशी संपर्क साधावा.
चित्रकला, हस्तकला प्रशिक्षण
लोकमत बाल विकास मंचतर्फे उन्हाळी शिबिर २०१५ अंतर्गत ८ मे पासून साकळी ८ ते १० या वेळेत येथील राजीव गांधी चौक स्थित शालवन स्पर्धा परीक्षा महाविद्यालयात चित्रकला व हस्तकला शिबिराची अंतिम नोंदणी करण्यात येईल.शहरातील बालविकास मंच सदस्यांना १०० रुपये शुल्क व इतरांना २०० रु. शुल्क आकारण्यात येईल. इच्छुक सदस्य व मुलं नोंदणी करू शकतील. अधिक माहितीकरिता जिल्हा संयोजक (९४२१०७१००१) यांच्याशी संपर्क साधावा.