स्पार्किंगने शेतातील उसाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 22:04 IST2018-10-28T22:04:17+5:302018-10-28T22:04:42+5:30

शेतातून गेलेल्या वीज तारांमध्ये घर्षण होवून पडलेल्या ठिणग्यांमुळे शेतातील उभा ऊस भस्मसात झाल्याची घटना मोहाडी तालुक्यातील खैरी येथे घडली. यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. खैरी येथे योगेश सहादेव ईश्वरकर यांचे शेत आहे. या शेतातून वीज तारा गेल्या आहेत.

Sparkling cane fire in the field | स्पार्किंगने शेतातील उसाला आग

स्पार्किंगने शेतातील उसाला आग

ठळक मुद्देएक लाखाचे नुकसान : वीज वितरणने भरपाई देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : शेतातून गेलेल्या वीज तारांमध्ये घर्षण होवून पडलेल्या ठिणग्यांमुळे शेतातील उभा ऊस भस्मसात झाल्याची घटना मोहाडी तालुक्यातील खैरी येथे घडली. यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले.
खैरी येथे योगेश सहादेव ईश्वरकर यांचे शेत आहे. या शेतातून वीज तारा गेल्या आहेत. या तारा लोंबकळलेल्या असून थोडीतरी हवा आली तरी त्यामध्ये घर्षण होते. त्यातून ठिणग्या पडतात.
दोन दिवसांपुर्वी विद्युत तारांचे घर्षण होवून ठिणगी पडली आणि त्यांच्या शेतातील संपूर्ण ऊस जळाला. हा प्रकार दिसताच परिसरातील शेतकºयांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र ऊस जळून खाक झाला. यात शेतकरी योगेश ईश्वरकर यांचे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. नुकसान भरपाई करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Sparkling cane fire in the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.