१़६६ लाख हेक्टर क्षेत्रातील पेरणी खोळंबली
By Admin | Updated: July 19, 2015 00:46 IST2015-07-19T00:46:34+5:302015-07-19T00:46:34+5:30
मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी आजपर्यत सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला असलातरी भंडारा जिल्ह्यातील ...

१़६६ लाख हेक्टर क्षेत्रातील पेरणी खोळंबली
भंडारा : मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी आजपर्यत सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला असलातरी भंडारा जिल्ह्यातील १ लाख ६६ हजार १३६ हेक्टर क्षेत्रातील पेरणी खोळंबली आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे ही वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. सध्यस्थितीत ३२ हजार ५०३ हेक्टर क्षेत्रात पिकाची पेरणी धोक्यात आली आहे़ जिल्ह्यात एक लाख ९८ हजार ६३९ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड होत असून, आतापर्यंत केवळ १६ टक्के हेक्टर क्षेत्रात प्रत्यक्ष पेरणी करण्यात आलेली आहे.
जिल्ह्यात १७ हजार ३४६ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी १७ हजार १८० हेक्टर क्षेत्रात भात नर्सरीची लागवड करण्यात आली असून त्याची टक्केवारी ९९ एवढी आहे. यामध्ये भंडारा तालुक्यात २,६९२ हेक्टर, पवनी २,३०० हेक्टर, मोहाडी ३,२५५ हेक्टर, तुमसर २,८८०, साकोली १,६६२, लाखांदूर २,६३१ तर लाखनी तालुक्यात २,०२८ हेक्टर क्षेत्रात भात नर्सरीची लागवड करण्यात आली.
दमदार पावसामुळे शेतकऱ्यांनी १० हजार २११ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी ८ हजार ६६७ हेक्टर क्षेत्रात आवत्याची लागवड केलेली आहे. त्याची टक्केवारी ८४ एवढी आहे. यामध्ये सर्वाधिक लागवड लाखनी तालुक्यात असून २,५७९ हेक्टर आहे. भंडारा ७६ हेक्टर, पवनी १,९९५, मोहाडी ६०, तुमसर निरंक, साकोली १,३८५ तर लाखांदूर तालुक्यात २,४८९ हेक्टर क्षेत्रात आवत्याची लागवड करण्यात आली.
जिल्ह्यात तुर ८,८७२, मुंग १२, तीळ ५८, सोयाबिन २,२३२, ऊस ४,०२२, हळद ४१०, कापूस ५१८, तर भाजिपाल्याची ४९९ हेक्टरमध्ये लागवड झाली. (नगर प्रतिनिधी)
रोवणी चार टक्के पूर्ण
जिल्ह्यात १ लाख ६७ हजार ८० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी केवळ ७,१४२ हेक्टर क्षेत्रात रोवणी लागवड केलेली आहे.मजुरांची मजुरी कडाडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे़ बियाने खते किटकनाशके यांच्या भावात कमालीची वाढ झाली आहे़