शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
3
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
4
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
5
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
6
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
7
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
8
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
9
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
10
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
11
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
12
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
13
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
14
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
15
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
16
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
17
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
18
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
19
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
20
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा

कालव्यात दुचाकी पडून मुलगा ठार, वडील गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 05:00 IST

मयंक विनोद इटवले (६) रा. दिघोरी असे मृताचे नाव आहे. तर विनोद मार्तंड इटवले (४५) असे गंभीर जखमीचे नाव आहे. रविवारी सायंकाळी विनोद इटवले खराशीवरुन दिघोरीकडे जात होते. झरप गावाजवळ कालव्याचा अंदाज न आल्याने दुचाकी या दोघांसह कालव्यात कोसळली. या घटनेची माहिती होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांनाही जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले.

ठळक मुद्देझरपची घटना : बांधकाम कंपनीच्या चुकीने अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कखराशी/पालांदूर : रस्त्यालगतच्या अपूर्ण बांधकाम झालेल्या कालव्यात दुचाकी कोसळून झालेल्या अपघातात सहा वर्षीय मुलगा ठार तर वडील गंभीर जखमी झाले. घटना लाखनी तालुक्यातील झरप गावाजवळ घडली.मयंक विनोद इटवले (६) रा. दिघोरी असे मृताचे नाव आहे. तर विनोद मार्तंड इटवले (४५) असे गंभीर जखमीचे नाव आहे. रविवारी सायंकाळी विनोद इटवले खराशीवरुन दिघोरीकडे जात होते. झरप गावाजवळ कालव्याचा अंदाज न आल्याने दुचाकी या दोघांसह कालव्यात कोसळली. या घटनेची माहिती होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांनाही जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले. मयंकची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला नागपूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास मयंकचा मृत्यू झाला. तर वडील विनोदवर भंडारा रुग्णालयात उपचार सुरु आहे.गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत नेरला उपसा सिंचन योजनेचे मुरमाडी तुपकर परिसरात कालव्याचे बांधकाम सुरु आहे. रचना एंटरप्राईजेस हे काम करीत आहे. कालवा बांधकामाच्या जागेवर वीज खांब आल्याने कंपनीने काम अर्धवट ठेवले आहे. त्यामुळे हा रस्ता अरुंद झाला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने येथे सूचना फलक लावला नसल्याने हा अपघात घडल्याचा आरोप आहे.कंपनी कर्मचाऱ्यावर गुन्हाअपघातास जबाबदार धरुन रचना एंटरप्राईजेस कंपनीचे कर्मचारी श्रीकांत गठाई रा. कामसरोवर ह.मु. मुरमाडी याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कंपनीने याठिकाणी सुचना फलक, रेडीयम पट्या व बॅरिकेट्स लावले नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :Deathमृत्यूAccidentअपघात